Home /News /viral /

23 वर्षांची मुलगी अन् 22 राजेनामे! असा सुरु केला स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या

23 वर्षांची मुलगी अन् 22 राजेनामे! असा सुरु केला स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या

23 वर्षांची मुलगी अन् 22 राजेनामे! असा सुरु केला स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या

23 वर्षांची मुलगी अन् 22 राजेनामे! असा सुरु केला स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या

अनास्तासिया सेचेटो (Anastasia Cechetto) आहे आणि ती लंडनस्थित मार्केटिंग एजन्सी Ace Influencers ची सीईओ (CEO) आणि संस्थापक आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी अनास्तासियाने तब्बल 22 वेगवेगळ्या ठिकाणी काम केले आहे. तिने बेकर, मॉडेल, SEO विशेषज्ञ, फिटनेस ट्रेनर आणि आइस्क्रीम विक्रेती म्हणूनही काम केले आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 जून : 'भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है', असं म्हणतात. एकीकडे आपल्या भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या पोरांना धड एक नोकरी मिळेना झालीये, पण तिकडे इंग्लंडमध्ये मात्र एका 23 वर्षाच्या मुलीने आतापर्यंत तब्बल 23 वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली आहे. विश्वास बसेना झालाय ना? पण हे एकदम खरं आहे. लंडनमधील एका मुलीने वयाच्या 23व्या वर्षीपर्यंत 23 वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या आहेत. अष्टपैलू असलेली ही मुलगी कधी आईस्क्रीम विकायची तर कधी बेकर (केक, ब्रेड इ.) म्हणून काम करायची. आता तर तिने स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू केला आहे. पण यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. 'द मिरर'च्या वृत्तानुसार, या मुलीचे नाव अनास्तासिया सेचेटो (Anastasia Cechetto) आहे आणि ती लंडनस्थित मार्केटिंग एजन्सी Ace Influencers ची सीईओ (CEO) आणि संस्थापक आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी अनास्तासियाने तब्बल 22 वेगवेगळ्या ठिकाणी काम केले आहे. तिने बेकर, मॉडेल, SEO विशेषज्ञ, फिटनेस ट्रेनर आणि आइस्क्रीम विक्रेती म्हणूनही काम केले आहे. एवढेच नाही तर हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे आणि वेट्रेसचे कामही तिनं केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनास्तासियाला तिच्या नोकरीवरून कधीही काढून टाकण्यात आले नाही, तिने स्वतःहून एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारली. परंतु सोशल मीडिया मॅनेजरची नोकरी तिचं आयुष्य बदलणारी ठरली. हीच नोकरी अनास्तासियाला तिचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरली. हेही वाचा: शाळा सुरू होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा Video; असं काय आहे यात तुम्हीच पाहा आपलं अष्टपैलू असणं हीच आपली खरी ताकद आहे, असं 23 वर्षीय अनास्तासियाला वाटतं. आपण एवढी कामं केली, ती सोडली. या प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आपण उत्कृष्ट कामगिरी केली नसेल, परंतु या प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं, असं ती मानते. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी स्वत:चा व्यवसाय सुरू करणारी अनास्तासिया एका कंपनीची सीईओ बनली आहे. आता ती लोकांना तिच्या आयुष्यातील अनुभव सांगते आणि व्यवसाय किंवा नोकरीमध्ये पुढे जाण्यासाठी टिप्स देते. अनास्तासिया म्हणते, "वयाच्या 16 व्या वर्षी, जेव्हा मी पूर्णपणे अननुभवी होते, तेव्हा मी बेकर म्हणून काम करायला सुरुवात केली." ती म्हणते की, हे काम खूप अवघड होतं आणि मी तिथे खूप गडबड केली. नंतर डिशवॉशर आणि वेट्रेस म्हणून काम केलं. या सर्व कठीण नोकऱ्यांनी मला शिस्त शिकवली आणि या नोकऱ्या करणाऱ्या लोकांचा मी आदर करते. हेही वाचा: पाणी वापरता की वॉटर पार्क चालवता? 26 लाखांचे बिल पाहून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न अनास्तासियाच्या म्हणण्यानुसार, ती सर्व कामातून काहीतरी शिकत गेली. त्यानंतर स्वत:चे काम सुरू केलं. पूर्वी केलेल्या कामाचा फायदा तिला स्वतःच्या व्यवसायात मिळत असल्याचे ती सांगते. इंग्रजी, रशियन, डच आणि इटालियन अशा चार भाषा बोलणाऱ्या अनास्तासियाने काही काळ अभिनय आणि मॉडेलिंगमध्येही नशिब आजमावले. अनास्तासिया म्हणते, मला शिकायला आवडतं. मी वेबसाइट्स आणि YouTube वरून शिकण्याचा प्रयत्न करते. वयाच्या 23 व्या वर्षी, जेव्हा मला समजले की, मी माझे स्वतःचे काम करू शकते, तेव्हा मी एक मार्केटिंग एजन्सी सुरू केली. मला वाटते की, तुम्ही तुमच्या मनाचे ऐकले पाहिजे, जर तुम्हाला असे वाटत असेल की एखादी गोष्ट तुमच्यासाठी नाही तर दुसरे काहीतरी करून पाहण्यास घाबरू नका. तुमची स्वप्ने पूर्ण करा."
    Published by:user_123
    First published:

    Tags: CEO, Job, Viral

    पुढील बातम्या