Home /News /viral /

मास्क न घातल्यानं पोलिसांनी दिली अजब शिक्षा; महिलेला संपूर्ण कपडे काढायला लावले अन्....

मास्क न घातल्यानं पोलिसांनी दिली अजब शिक्षा; महिलेला संपूर्ण कपडे काढायला लावले अन्....

महिलेनं सांगितलं, तिला आरोग्यविषयक गंभीर समस्या आहे. यामुळे, तिला मास्क घालण्यापासून सूट मिळाली आहे.

    नवी दिल्ली 18 सप्टेंबर : कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी या महामारीच्या काळात मास्क (Face Mask) वापरणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक लोक हे नियम पाळत मास्क वापरतात. मात्र, काही लोक अजूनही हलगर्जीपणा करताना दिसतात आणि मास्कचा वापर करत नाहीत. काही लोक असेही आहेत जे काही शारीरिक समस्यांमुळे मास्क वापरू शकत नाहीत. अशीच परिस्थिती इंग्लंडमधील एक महिलेची आहे. आपल्या काही समस्यांमुळे ती मास्क लावू शकत नाही. मात्र, याची तिला इतकी मोठी शिक्षा मिळाली की तिला अपमान सहन करावा लागला. काय? बड्या कंपनीच्या Bra मध्ये कॅमेरा; महिलेने VIDEO पोस्ट करताच उलगडला मोठा राज ही घटना याच वर्षी 25 फेब्रुवारीची आहे, जेव्हा इंग्लंडमध्ये (England) मास्क (Mask) घालणं अनिवार्य होतं. इंग्लंडच्या ससेक्समध्ये राहणारी ज्युलिएट जॉन्सन वेटरोज सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. तिनं मास्क घातलेलं नव्हतं. या महिलेनं सांगितलं, की जेव्हा ती सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करत होती तेव्हाच तेथील सिक्यूरिटी गार्ड तिला मास्क घालण्यासाठी सांगू लागला. महिलेनं सांगितलं, तिला आरोग्यविषयक गंभीर समस्या आहे. यामुळे, तिला मास्क घालण्यापासून सूट मिळाली आहे. तिनं या गार्डला डॉक्टरांचे काहीही पेपरही पुरावा म्हणून दाखवले. गार्डनंतर दुकानाचा मॅनेजर या महिलेला ओरडू लागला तेव्हा तिनं त्यालाही हेच सांगितलं. मात्र, त्यानं पोलिसांना बोलावलं. हातातून रक्त आलं पण पिच्छा सोडला नाही; चोर-पोलिसातील सिनेस्टाईल थराराचा VIDEO पोलीस याठिकाणी पोहोचले तेव्हा महिलेनं त्यांनाही हे सर्व सांगितलं. मात्र, पोलिसांनी तिच्यावर विश्वास न ठेवत तिला अटक करून पोलीस ठाण्यात नेलं. यानंतर तिथे उपस्थित महिला पोलिसांनी या महिलेवर जबरदस्ती करत तिला सांगितलं, की आपले पूर्ण कपडे काढ. कारण, तुझी तपासणी केली जाईल आणि नंतर तुला जेलचे कपडे घालावे लागतील. पीडित महिलेला समजलंच नाही की अशा वेळेत काय करावं. मात्र, पोलिसांच्या चेहऱ्यावरील राग पाहून तिनं आपले सगळे कपडे काढले (Police Made Woman Strip Clothes). महिलेला काही तासातच पोलिसांनी तुरुंगातून सोडलं. मात्र, या घटनेनंतर महिलेनं ससेक्स पोलिसांत (Susex Police) तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप तिनं केला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Mask, Viral news

    पुढील बातम्या