Home /News /viral /

काय? बड्या कंपनीच्या Bra मध्ये कॅमेरा; महिलेने VIDEO पोस्ट करताच उलगडला मोठा 'छुपा राज'

काय? बड्या कंपनीच्या Bra मध्ये कॅमेरा; महिलेने VIDEO पोस्ट करताच उलगडला मोठा 'छुपा राज'

ब्रामध्ये कॅमेरा लावल्याचा आरोप करत महिलेने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला.

    वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर : आतापर्यंत मॉल किंवा कपड्यांच्या दुकानातच चेंजिंग रूममध्ये छुपे कॅमेरे (Hidden camera in changing room) लावले जात असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे चेंजिंग रूममध्ये (Hidden camera) आपण थोडं सावधच असतो. पण आता तर एका महिलेला चक्क कपड्यांमध्ये कॅमेरा (Camera in Bra) सापडला आहे. एका प्रसिद्ध कंपनीने ब्रामध्ये कॅमेरा (Tracking Device In Bra) लावल्याचा दावा एका महिलेने केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली (Secret camera). प्रसिद्ध कंपनी विक्टोरिया सीक्रेटवर (Victoria Secrets) ब्रामध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस लावल्याचा आरोप करत एका महिलेने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ब्रामध्ये छुपा राज सर्वांसमोर आला. यामागील सत्याचा उलगडा झाला. महिलेने व्हिक्टोरिया सिक्रेटमधून ब्रा खरेदी केली. त्यानंतर ब्रामध्ये तिला काहीतरी विचित्र असल्याचं दिसलं. तिनं ब्रा खोलून पाहिलं आणि आत काय आहे ते पाहिलं. पाहते तर काय तिला ब्रामध्ये चक्क एक डिव्हाइस सापडलं. हा सिक्रेट कॅमेरा आहे, असा दावा या महिलेने केला. कंपनी लोकांवर नजर ठेवण्यासाठी ब्रामध्ये कॅमेरा लावून विकत असल्याचा आरोप तिने कंपनीवर केला. या ब्राचा व्हिडीओ बनवून तिने सोशल मीडिया रेडिटवर शेअर केला. हे वाचा - घातक DIY VIDEO: व्हजायनामध्ये हात घालून कॉपर टी स्वतःच ओढून काढत आहेत स्त्रिया ब्रामध्ये कॅमेरा म्हटल्यावर सर्वांनाच धक्का बसला. लोकांनी हा व्हिडीओ नीट पाहिला. त्यानंतर त्यामागील सत्य समोर आलं. जवळपास एक मिनिटाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ज्या डिव्हाइसला की महिला ट्रॅकिंग डिव्हाइस समजत होती ते खरंतर अँटीथेफ्ट डिव्हाइस होतं. दुकानात कपड्यांची चोरी होऊ नये, म्हणून हे डिव्हाइस कपड्यांवर लावलं जातं.  या महिलेने ब्रा खरेदी केल्यानंतर तिला देताना दुकानदार हा RFID टॅग काढायला विसरला. त्यामुळे ते तसंच राहिलं. महिलेने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सत्याचा उलगडा झाला आणि नेटिझन्सना हसू आवरलं नाही. महिलेची सर्वांनी मजा घेतली, तिची मस्करी केली. तिच्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या. चेंजिंग रूममध्ये असू शकतो छुपा कॅमेरा बरं कपड्यांमध्ये छुपा कॅमेरा नाही पण कपडे घ्यायला गेल्यानंतर मात्र जरूर काळजी घ्या. तिथं छुपा कॅमेरा असू शकतो. आता एखाद्या चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा आहे की नाही हे कसं ओळखायचं पाहुयात. ट्रायल रूममध्ये गेल्यावर कपडे बदलण्यापूर्वी लाइट बंद करा आणि मोबाइलचा टॉर्च सुरू करून तो आरशावर पाडा. लाइट दुसऱ्या बाजूला जात असेल तर समजून जा काहीतरी गडबड आहे. लाइट आरपार गेला नाही तर समजून जा ट्रायल रूम सेफ आहे. हे वाचा - स्वतःची लघवी पिऊन लेकरांना पाजलं दूध; भरसमुद्रात मुलांना वाचवून आईने सोडला जीव आरशावर एकदा नॉक करून पाहा. आवाज सामान्य असल्यास चेंजिंग रूम सेफ आहे. आरसा दोन्ही बाजूने असल्यास पोकळ वस्तूवर नॉक केल्याप्रमाणे आवाज येईल. अशावेळी दुसरीकडून तुमच्यावर नजर ठेवली जात असल्याचं समजावं. साधा उपाय करायचा असल्यास आरशावर बोट ठेवा. काही गडबड नसेल तर तुमच्या बोटात आणि आरशात एक गॅप दिसून येईल. पण जर दोन्हीमध्ये गॅप नसेल तर त्या आरशात गडबड आहे हे समजून घ्यावं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Camera, Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या