जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: श्वानाने दिला व्यक्तीला CPR; छातीवर उडी घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न, पाहून व्हाल अवाक

Viral Video: श्वानाने दिला व्यक्तीला CPR; छातीवर उडी घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न, पाहून व्हाल अवाक

श्वानाने दिला व्यक्तीला CPR

श्वानाने दिला व्यक्तीला CPR

एक पोलीस डॉग आपल्या ट्रेनरला CPR देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की एखादा प्राणी इतका बुद्धिमान असू शकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 जुलै : श्वान हे अतिशय बुद्धिमान प्राणी असतात. माणसांना मदत करायला तर ते सदैव तत्पर असतात. याच कारणामुळे त्यांना मानवाचा सर्वात चांगला मित्र मानलं जातं. अशातच जेव्हा कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जातं, तेव्हा तर ते माणसांनाही काहीही मदत करायला पुढे येतात. नुकताच हेच दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पोलीस डॉग आपल्या ट्रेनरला CPR देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की एखादा प्राणी इतका बुद्धिमान असू शकतो. नुकतंच @_B___S नावाच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक कुत्रा आपल्या ट्रेनरला मदत करताना दिसत आहे. व्हिडिओबद्दल सांगण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की त्यातील व्यक्ती प्रत्यक्षात बेशुद्ध झालेली नाही. तर तो बेशुद्ध होण्याचं नाटक करत आहे, जेणेकरून कुत्रा सीपीआर देऊ शकेल. तुम्ही आजपर्यंत अनेकदा असे व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये श्वान आपल्या मालकाकडे वर्तमानपत्र, चेंडू किंवा इतर कोणतीही वस्तू घेऊन जात असतात. पण या व्हिडिओमध्ये कुत्रा एखाद्या व्यक्तीला CPR देत असल्याचं तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

जाहिरात

CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो किंवा श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा त्याला CPR दिला जातो. व्यक्तीची छाती दोन्ही हातांनी दाबली जाते आणि त्याला तोंडावाटे श्वास दिला जातो. कुत्राही असंच करताना दिसत आहे. पोलीस कर्मचारी जमिनीवर पडून बेशुद्ध झाल्याचं नाटक करताच कुत्रा धावत येतो आणि समोरच्या दोन्ही पायांनी त्या व्यक्तीवर उड्या मारू लागतो. तो या व्यक्तीच्या पोटावर आणि छातीवर उडी मारतो. यानंतर आपले कान त्या व्यक्तीच्या मानेजवळ नेत त्याचा श्वास तपासण्याचा प्रयत्न करतो. Viral Video : या ठिकाणी रस्त्यावर फिरताना दिसली मगर, पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण या व्हिडिओला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, की कुत्रा त्या व्यक्तीला जिवंत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दुसऱ्याने म्हटलं की, कुत्रा ज्या प्रकारे व्यक्तीचं पोट दाबत आहे ती सीपीआर द्यायची जागा नाही, पण तो कुत्रा इतका गोंडस आहे की व्हिडिओ तुमचं मन जिंकेल. आणखी एका म्हटलं, की कुत्रा त्या टेक्निकने कोणाचाही जीव वाचवू शकणार नाही, पण मरताना जवळ कुत्रा पाहून त्याला खूप आनंद होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात