नवी दिल्ली, 20 जुलै: पावसाचं आगमन झालं असून देशभरात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी लोक पावसानं सुखावले आहेत तर कुठे मुसळधार पावसानं नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे. पावसाचं आगमन होताच एका ठिकाणी राहत्या ठिकाणी मगरींचा वावर दिसून आला. मगर बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना आढळली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. राजस्थानमधील कोटामधून ही घटना समोर आली आहे. या ठिकाणी निवासी भागात मगर फिरताना दिसली. एका व्यक्तीनं ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. मगरीची दहशत वाढवणारा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
@nitinindianews नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 40 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीची वेळ आहे आणि रस्त्यावर कमी वर्दळ आहे. एक मगर आरामात रस्ता ओलांडत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या नाल्यात मगर जातो. रस्त्यावर मगरीच्या हालचालीमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली. मगरीचा रस्ता ओलांडतानाचा हा व्हिडीओ एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केला आहे.
कोटा में मगरमच्छ इस अंदाज में घूमते हुए @jaina111 pic.twitter.com/02ynVoPfJp
— Nitin Sharma (@nitinindianews) July 19, 2023
तळवंडी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एक मगर मुख्य रस्ता ओलांडताना दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून सगळेच अवाक् झाले. 40 सेकंदाचा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ उडवत आहे.