हे भन्नाट आहे! हेल्मेटनंतर आता 'कोरोना'ची आली कार, PHOTO VIRAL

हे भन्नाट आहे! हेल्मेटनंतर आता 'कोरोना'ची आली कार, PHOTO VIRAL

हैदराबाद इथल्या सुधाकर यादव नावाच्या तरुणानं ही कार डिझाइन केली आहे. ही कार डिझान करून त्याने लोकांना लॉकडाऊन आणि सरकारचे आदेश पाळण्याचं आवाहन केलं आहे.

  • Share this:

हैदराबाद, 09 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे 15 लाखहून अधिक लोक संक्रमित आहे. तर कोरोनामुळे जवळपास 88 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लोकांना घरात क्वारंटाइन केलं जात आहे. इतकच नाही तर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन कर्फ्यू लावण्यात आला आहे. तरीही अनेक लोकांना अजूनही कोरोनाच्या संसर्गाचं गांभीर्य कळत नसल्यानं घराबाहेर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात 5 हजार 274 रुग्ण आढळले आहेत त्यापैकी 1 हजार 74 रुग्ण महाराष्ट्रातील तर 700हून अधिक रुग्ण मुंबईतले आहेत. याआधी कोरोनाचे हेल्मेट तुफान व्हायरल झाले होते. आता या हेल्मेटनंतर कोरोना व्हायरस नावाची एक खास कार डिझाइन कऱण्यात आली आहे. ही गाडी डिझाडीन करून लोकांना सुरक्षित घरी राहण्याचा मेसेज दिला आहे. हैदराबाद इथल्या सुधाकर यादव नावाच्या तरुणानं ही कार डिझाइन केली आहे. ही कार डिझान करून त्याने लोकांना लॉकडाऊन आणि सरकारचे आदेश पाळण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या हेल्मेटनंतर आता ही कार सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे.

हे वाचा-कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार होईपर्यंत भारतात मृतांचा आकडा आहे सगळ्यात जास्त

7 एप्रिलला या कारचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. ही कार तयार करण्यामागचा उद्देश प्रामुख्यानं कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखणं आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुधाकर यादव यांनी 100 सीसी इंजिन असलेली ही कार तयार केली. घराबाहेर जाणं टाळावं, जगभरातील साथीचा रोग टाळण्यासाठी घरातच राहावे. ही कार घेऊन ते घरोघरी हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

याचा आकार छोटा आहे. सी-सीटर कार प्लोरोसंट ग्रीन फायबरने बनवलेली आहे. व्हायरससारख्या दिसणाऱ्या स्पाइकसह ही कार हैदराबादच्या रस्त्यावर फिरत आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्याविषयी वारंवार आठवण करून देत आहे. गेल्या पाच दशकांपासून ते अशा पद्धतीच्या विचित्र आकारांच्या गाड्या तयार करण्याचं त्यांना वेड आहे. ही गाडी लॉकडाऊन दरम्यान वापरण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना देणगी म्हणून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याआधी त्यांनी बर्गर, क्रिकेट ब़ल संगणकाच्या आकाराच्या गाड्या तयार केल्या आहेत. त्यांच्या या कौशल्याची आणि कारची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

हे वाचा-लोकांच्या जीवाशी का खेळतोय चीन? आणखी एका देशाला पाठवले 60 हजार नकली मास्क

First published: April 9, 2020, 10:57 AM IST

ताज्या बातम्या