अरे देवा! दुसऱ्या बायकोची आठवण आली म्हणून लॉकडाऊनमध्ये पोलिसांना केला कॉल आणि...

अरे देवा! दुसऱ्या बायकोची आठवण आली म्हणून लॉकडाऊनमध्ये पोलिसांना केला कॉल आणि...

दुसऱ्या बायकोला भेटायला जाऊ का? लॉकडाउनमध्ये पोलिसांनकडे परवानगी मागायला गेला, पुढे काय झालं पाहा.

  • Share this:

दुबई, 09 एप्रिल : जगभरात सध्या कोरोनानं थैमान घातले आहे. त्यामुळं संपूर्ण जग जवळजवळ लॉकडाउन आहे. दुबईमध्येही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर लॉकडाउन घोषित करण्यात आला. सध्या दुबईमधील संक्रमित भागात निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान अजूनही लोकं लॉकडाउन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. असाच एक प्रसंग दुबईमध्ये घडला. एका इसमाने लॉकडाउनमध्ये बाहेर पडण्यासाठी पोलिसांची परवानगी मागितली. पोलिसांनी, काय काम आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यानं जे उत्तर दिलं, त्यामुळं पोलिसांनाही हसु अनावर झाले.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दुबई पोलिसांना एक फोन आला. यावेळी एका व्यक्तीने त्यांना दुसऱ्या बायकोला भेटायला जायचे आहे, जाऊ का? असे विचारले. दुबईमध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे कर्फ्यू पाससाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. दुबई पोलिसांना हा फोन आल्यानंतर हसू आवरले नाही. दुबई पोलीस प्रमुख एका रेडिओ कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कोरोना विषाणू आणि लॉकडाउनशी संबंधित माहिती देताना हा किस्सा सांगितला.

वाचा-VIDEO : सावधान! ग्लोव्ह्जमुळेही पसरू शकतो कोरोना, नर्सनं सांगितलं कारण

पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

या व्यक्तीचा हा प्रश्न ऐकून दुबई ट्रॅफिक पोलिसांचे प्रमुख, रेडिओवर लाइव्ह असलेले ब्रिगेडिअर सैफ मुहर अल मजरोईही हसू लागले. ते पुढे म्हणाले की, दुसर्‍या पत्नीला भेटाण्याचे चांगले निमित्त आहे. मात्र पोलिसांनी अशा घटनांमध्ये परवानग्या दिल्या जात नाहीत. पोलिसांनी या व्यक्तीला, काही दिवस तुम्ही एकाच पत्नीबरोबर राहा, असा सल्लाही दिला. लॉकडाउननंतर असे अनेक फोन कॉल आले असल्याचे सैफ मुहैर यांनी रेडिओ कार्यक्रमात सांगितले. कर्फ्यू पास देण्याची परवानगी फक्त त्याच लोकांना आहे जे नोकरी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर जात आहेत.

वाचा-आता घरबसल्या करा ट्रेकिंग! विश्वास नसेल बसत तर पाहा हा VIDEO

सौदी अरेबियामध्ये परिस्थिती बिकट

सौदी अरेबियामध्ये 2795 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 41 जणांचा मृत्यू झाला आहे. या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतरच त्यांनी संपूर्ण शहराला लॉकडाउन केले होते. मात्र लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. परिणामी कोरोना देशभर पसरला. त्यामुळे जवळजवळ 3 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाने सर्व जनतेला क्वारंटाइन केले आहे. केवळ वैद्यकिय कर्मचारी आणि पोलीसांना मुभा देण्यात आली आहे. सौदीच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाची स्थिती पाहता, येत्या काळात 2 लाख लोकांना कोरोना होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळं लोकांना नियमाचे पालन करण्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. सौदी अरेबियाने आपली सर्व प्रवासी उड्डाणे रद्द केली आहेत. देशातील सर्व व्यवसाय उपक्रम बंद आहेत.

First published: April 9, 2020, 2:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या