लखनऊ 14 ऑगस्ट : रोड रेज प्रकरणांचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. अशा प्रकरणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता नोएडामधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला ई-रिक्षा चालकाला मारहाण करताना दिसत आहे. या धक्कादायक व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर महिलेने ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. ब्रेकअप झाल्याने नाराज झालेल्या प्रियकराने महिलेचे कपडे काढले अन्.. गुन्हा दाखल नोएडा पोलिसांनी शनिवारी एका महिलेला सार्वजनिकरित्या ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी महिलेचं नाव किरण सिंह असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. ती मूळची आग्रा येथील आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितलं की, किरण सिंह चालवत असलेली वॅगन कार आणि ई-रिक्षा यांच्यात झालेल्या किरकोळ अपघातानंतर ही घटना घडली.
17 slaps in 90 seconds. This lady humiliated a rickshaw puller for a minor incident happened in Noida. She reminds me Lucknow girl incident.#Noida #LaalSinghChadha #SalmanRushdie #jaihind #HarGharTringa #Pathaan #FlopLaalSinghChaddha pic.twitter.com/d5K4Lep8Mf
— Nishant Kataria ✸ (@Nishantdnd) August 13, 2022
अधिका-याने सांगितलं, की “महिला कारमधून खाली उतरली आणि तिने ई-रिक्षा चालकाला अनेकवेळा चापट मारली.” व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी महिला केवळ 90 सेकंदात किमान 17 वेळा ई-रिक्षा चालकाला कानशिलात मारताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर, तरुणाला प्रचंड मारहाण, नेमकं प्रकरण काय? ही महिला ई-रिक्षा चालकाच्या कॉलरला पकडून त्याला कारवरील खुणा दाखवताना दिसत आहे आणि त्याला चापट मारत आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

)







