झाबुआ, 13 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये एका 28 वर्षीय महिलेला रस्त्याच्या मधोमध नग्न करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने तिच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत ब्रेकअप करून पतीकडे परत आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, प्रियकराकडून परत आलेल्या या महिलेल्या तिच्या पतीनेही स्विकारले. काय आहे संपूर्ण प्रकरण - प्रियकराने ब्रेकअपचा राग आपल्या विवाहित प्रेयसीवर काढला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झाबुआचे पोलीस अधीक्षक अरविंद तिवारी यांनी सांगितले की, पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी लिव्ह-इन पार्टनर मुकेश तिच्यावर अत्याचार करत असे, त्यामुळे ती नाराज झाली होती. यानंतर ती तिच्या पतीच्या घरी परतली होती. तसेच पीडितेच्या पतीनेही तिला स्वीकारले. त्याचवेळी याचा राग येऊन आरोपी मुकेशने गोंधळ घातला आणि तसेच पीडितेचे कपडे फाडले. यावेळी त्याने तिला मारहाणही केली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश आणि त्याचे इतर साथीदार पीडित महिलेचे कपडे फाडताना आणि रस्त्याच्या मधोमध मारहाण करताना दिसत आहेत. तर ग्रामस्थांनी महिलेला वाचवले. हेही वाचा - आधी महिलेने केला पतीचा गेम; 22 महिने सासूला गंडवत राहिली, शेवटी नंदेने केली पोलखोल पोलिसांनी सांगितले की, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, या प्रकरणाची गंभीर दखल घेत, कलम 323, 147, 354 आणि 506 अंतर्गत 5 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्य आरोपी मुकेश कटारासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.