मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर, तरुणाला प्रचंड मारहाण, नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर, तरुणाला प्रचंड मारहाण, नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात भल्या पहाटे एका दूधाची डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला सात ते आठ जणांकडून कारण नसताना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil
ठाणे, 13 ऑगस्ट : कल्याण पूर्वेत गुन्हेगारांचा हैदोस बघायला मिळतोय. शहरात एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आता आणखी एका धक्कादायक घटनेने शहर हादरलं आहे. कल्याण पूर्वेत भल्या पहाटे एका निष्पाप दूध वितरकावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. सात ते आठ नराधमांनी मिळून दूध वितरक तरूणाला बेदम मारहाण करून ठेचण्याचा प्रयत्न केला. आरोपी नराधमांनी पीडित तरुणावर दगडफेक केली. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाला आहे. तरूणाला डोक्यावर सहा ते सात टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील दूध वितरक आणि इतर किरकोळ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात घडली. पीडित तरूण हा दूधाची डिलिव्हरी करत असताना हनुमान नगरच्या दिशेला जात होता. या दरम्यान काही उत्तर भारतीय तरूणांनी भर रस्त्यावर तरूणाची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. पहाटे पाच वाजेची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपींनी तरूणाची गाडी अडवली. आरोपी तरूण हे नशेत होते. नशेत त्यांनी दूध वितरक तरूणाच्या मालवाहू चारचाकी गाडीच्या दगडाने काचा फोडल्या. आरोपी तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी गाडीत असलेल्या दूध वितरक तरूणाला जबरदस्ती बाहेर खेचले. त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तरूणाला प्रचंड मारहाण केली. आरोपींनी त्यानंतर रस्त्यावर जल्लोष केला. त्यांनी स्वतः च्या अंगावरील कपडे काढत नंगानाच केला. दुसरीकडे पीडित तरूण हा भर रस्त्यावर जखमी अवस्थेत वेदनांनी व्हिव्हळत होता. (200 ml पेट्रोल प्यायला अन् कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; नागपूरातील BCA च्या विद्यार्थ्याचा मृत्यू) पीडित तरुणाने फोनवरून आपल्या कुटुंबियांना संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित तरूणाला तातडीने रुग्णालयात नेलं. तिथे तरूणावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तरूणाला डोक्यावर सहा ते सात टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पीडित तरूणाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपास करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचा या घटनेप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या घटनेमुळे संतप्त झालेल्या दूध वितरकांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या तरूणावर हा हल्ला झालाय तो तरूण अतिशय सृजनशील, सामंजस आणि संवेदनशील आहे. तरूणाचा स्वभाव चांगला असल्याने परिसरात या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस या प्रकरणी खरंच काही कठोर कारवाई करतात की पुन्हा ये रे माझा मागल्या समजून हे प्रकरण फाईलबंद होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, दूध वितरक किंवा दुधाच्या गाडीवर हल्ला होणारी ही पहिली घटना नाही. याआधी देखील परिसरात गोकुळ दुधाच्या गाडीवर नराधमांकडून हल्ला झाला होता. त्यावेळीदेखील आरोपी नशेतच होते. त्यानंतर पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने शहारात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर आरोपींना खरंच पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे स्पष्ट झालं आहे.
First published:

Tags: Crime, Crime news, Kalyan

पुढील बातम्या