नवी दिल्ली 17 ऑगस्ट : एका महिलेला लग्नानंतर (Marriage) अनेक वर्षांनी हे समजलं, की तिचा पती आधीपासूनच विवाहित आहे. पतीनं तिला गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात ठेवलं होतं. मात्र, पतीनं लपवून ठेवलेली ही बाब ज्या पद्धतीनं उघड झाली त्याची कथाही रंजक आहे. ही घटना लंडन (London) येथील आहे. मारिया गुइलेन गार्सिया (Maria Guillen Garcia) नावाच्या महिलेला असा संशय होता, की तिचा पती टॉम मॅककेबे (Tom McCabe) तिच्यासोबत प्रामाणिक नाही. महिलेचा हा संशय आणखीच वाढला जेव्हा तिनं आपल्या पतीच्या फोनमध्ये एका कुटुंबाचे फोटो पाहिले आणि इथूनच तिनं तपासाला सुरुवात केली. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, मारिया म्हणाली की मॅककेबेसोबत तिचे भेट 2009 मध्ये झाली होती. नऊ महिन्यांच्या ओळखीनंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र, जेव्हा ती हे लग्न रजिस्टर करण्यासाठी ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा नवरदेव गायब होता. नंतर विचारणा केली असता त्यानं म्हटलं, की मला तुझ्यासाठी काही फुलं घ्यायची होती. त्यामुळे मी बाहेर गेलो होतो. …अन् जीव वाचवण्यासाठी बिबट्याची धडपड; कधीच पाहिला नसेल असा VIDEO सात वर्षांनंतर मारियाला हे माहिती झालं, की मॅककेबे त्यावेळी कुठे गेला होता आणि तो का घाबरला होता. तो आधीपासूनच विवाहित होता आणि हे मारियाला माहिती होऊ नये यासाठी तो रजिस्टर ऑफिसमधून गायब झाला होता. मॅककेबचं सत्य तेव्हा समोर आलं जेव्हा मारिया त्याचा फोन घेऊन सॉफ्टवेअर अपडेट करत होती. याचदरम्यान तिनं तिच्या पतीच्या फेसबुकवर त्याच्या पहिल्या कुटुंबाचे फोटो पाहिले आणि तिला समजलं की त्यानं आपल्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटही घेतला नव्हता. त्यांची 23 वर्षांची एक मुलगीदेखील आहे. पहिली पत्नी आणि मारिया यांनी फेसबुकवर चॅटिंग केली आणि मॅककेबेचं पितळं उघडं पडलं. प्रेयसी गर्भवती होताच लग्नाला नकार देत प्रियकर फरार; पोलिसांनी मिळवून दिला न्याय याप्रकरणी पोलिसांनी 2016 साली मॅककेबे याची चौकशी केली मात्र तो फरार झाला. मात्र, आता तो पकडला गेला असून त्यानं कोर्टात दोन पत्नी असल्याचं मान्य केलं आहे. या प्रकरणी आता त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. पहिली पत्नी असतानाही दुसरं लग्न केल्याप्रकरणी त्याला सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आता मारियानं मॅककेबे याला घटस्फोट दिला आहे. तिनं सांगितलं, की त्याच्या पहिल्या पत्नीसोबत आणि मुलीसोबत माझं फेसबुकवर बोलणं झालं आहे, त्यानं आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







