मुंबई, 17 ऑगस्ट : बिबट्या (Bibtya) वेगवान, चपळ असा प्राणी. ज्याच्यासमोर कोणताच प्राणी (Animal video) टिकू शकत नाही. त्याच्या समोर कुणी आला तर त्याचा त्याने फडशा पाडलाच. पण अशा बिबट्यासमोर (Bibtya video) एक असा प्राणी आला ज्यामुळे बिबट्याचं (Leopard) मांजर झालं. एरवी सर्व प्राण्यांना जीवासाठी तडफडायला लावणारा बिबट्या (Leopard video) स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसला. बिबट्याच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण बिबट्याचा असा व्हिडीओ कदाचित कधीच पाहिल नसेल. किंबहुना इतका घाबरलेला बिबट्या तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल.
Reverse swing...
— Susanta Nanda (@susantananda3) August 16, 2021
Courtesy: life & Nature pic.twitter.com/g62e2zLA51
व्हिडीओत पाहू शकता, बिबट्या पळताना दिसतो आहे. पण तो कोणत्या प्राण्याची शिकार करण्यासाठी नाही तर आपण दुसऱ्या प्राण्याचे शिकार होण्यापासून वाचण्यासाठी. हे वाचा - VIDEO - आकाशातून आलेल्या मृत्यूलाही दिला चकवा; हुश्शार सशाने एका उडीत वाचवला जीव बिबट्याच्या मागे नीलगाय लागली आहे. पळणाऱ्या बिबट्याचा पाठलाग करत नीलगाय येते. बिबट्याच्या पुढे येत ते बिबट्याचा रस्ता अडवते. बिबट्या तिथून पळण्याचा प्रयत्न करतो. निलगाईच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडतो. पण नीलगाय काही त्याच्या मार्गातून बाजूला होत नाही. ती त्याच्यावर हल्ला करताना दिसते. बिबट्याचा चेहरा नीट पाहिला. तर तो किती घाबरलेला आहे ते दिसेल. बिबट्याला आपल्यासमोर आपला मृत्यू दिसत होता. नीलगाईकडे पाहत जणू तो आपल्या जीवाची भीकच मागतो आहे, असं दिसतं आहे. कदाचित त्याला यावेळी त्याने शिकार केलेल्या प्राण्यांच्या अवस्थेचीही कल्पना आलीच असावी. हे वाचा - मासे पकडता पकडता समोर आली मगर आणि… धडकी भरवणारा VIDEO आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.