मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फेक नावानं ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश; 12 वीच्या विद्यार्थ्यानं कॅमेरा सुरू करत काढले सर्व कपडे अन्..

फेक नावानं ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश; 12 वीच्या विद्यार्थ्यानं कॅमेरा सुरू करत काढले सर्व कपडे अन्..

जेव्हा ऑनलाईन क्लास सुरू झाला तेव्हा आरोपी विना कपडे कॅमेऱ्यासमोर उभा राहिला आणि अश्लील कृत्य करू लागला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

जेव्हा ऑनलाईन क्लास सुरू झाला तेव्हा आरोपी विना कपडे कॅमेऱ्यासमोर उभा राहिला आणि अश्लील कृत्य करू लागला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

जेव्हा ऑनलाईन क्लास सुरू झाला तेव्हा आरोपी विना कपडे कॅमेऱ्यासमोर उभा राहिला आणि अश्लील कृत्य करू लागला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 18 जुलै : एका विद्यार्थ्यानं ऑनलाईन क्लासदरम्यान (Online Class) आपत्तीजनक कृत्य केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. बारावीच्या या विद्यार्थ्यानं आपल्या स्कूल फ्रेंडकडून (School Friend) त्यांच्या ऑनलाईन क्लासची लिंक (Link of Online Class) घेतली. यानंतर फेक मेल आय़डी तयार करून ऑनलाईन क्लासमध्ये कनेक्ट झाला. जेव्हा त्याचा नंबर आला तेव्हा तो कपडे काढून कॅमेऱ्यासमोर (Camera) उभा राहिला.

ज्या विद्यार्थ्याच्या नावानं आरोपीनं क्लास जॉईन केला होता त्या विद्यार्थ्याला काही समजलंही नाही. ही घटना ग्वालियरमधील भिंड रोड येथील एका खासगी शाळेतील आहे. या प्रकरणी राज्य सायबर झोनकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केली आहे. यानंतर आरोपी आणि त्याला लिंक देणारा कॉलेजचा विद्यार्थी या दोघांना शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

प्रेमासाठी कायपण! दीड वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या सैराट कपलला अखेर अटक

राज्य सायबर सेल पोलीस झोन ग्वालियरचे एसपी सुधीर अग्रवाल यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी ग्वालियरच्या महाराजपुरा येथील भिंड रोडवरील खासगी शाळेतून तक्रार आली होती. यात म्हटलं गेलं, की कोणीतरी त्यांच्या कॉलेजच्या ऑनलाईन क्लासची लिंक मिळवली आणि यानंतर कॉलेजच्या एका विद्यार्थ्याच्या नावानं फेक आयडी बनवला. जेव्हा ऑनलाईन क्लास सुरू झाला तेव्हा आरोपी विना कपडे कॅमेऱ्यासमोर उभा राहिला आणि अश्लील कृत्य करू लागला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ज्या विद्यार्थ्याच्या नावानं आरोपीनं ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश मिळवला त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे, की त्याला काहीच माहिती नाही. त्यादिवशी त्याला जॉईन होता आलं नाही. यानंतर टीमनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस शिवपुरी येथील विद्यार्थी सोनू ( नाव बदललं आहे) याच्यापर्यंत पोहोचले, यानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.

जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले

चौकशीदरम्यान असा खुलासा झाला की, शिवपुरीमधील 12 चा विद्यार्थीच कॉलेजची ऑनलाईन क्लासची लिंक मिळवून फेक नावानं क्लास जॉईन करत होता. जेव्हा त्याचा टर्न आला तेव्हा त्यानं हे घाणेरडं कृत्य केलं. यामुळे संपूर्ण क्लासमध्ये गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या एका मित्रालाही ताब्यात घेतलं आहे, जो त्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. टिंकू ( बदलेलं नाव) सोबत सोनू PUBG खेळत असे. याच खेळादरम्यान त्याचं टिंकूकडून ऑनलाईन क्लासची लिंक घेतली. टिंकूनंच आपल्या एका मित्राचं नाव सांगितलं. याच नावानं ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश करत सोनू घाणेरडं कृत्य करू लागला.

First published:

Tags: Crime, Online education, Viral news