• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • जिवंत बाळाला डॉक्टरांनी केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले

जिवंत बाळाला डॉक्टरांनी केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले

बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचं अंत्यविधी न करताच रुगणालयातून पळ काढला

बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचं अंत्यविधी न करताच रुगणालयातून पळ काढला

एका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केलं (Baby Found to be Alive After Hospital Declared Dead). डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.

 • Share this:
  रांची 18 जुलै: एका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केलं (Baby Found to be Alive After Hospital Declared Dead). यामुळे वैतागलेल्या नातेवाईकांनी क्लिनिकची तोडफोड करत आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना झारखंडच्या (Jharkhand) देवघरमधील काली मंडा रोडवरील एका खासगी रुग्णालयातील आहे. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केलं. जलसमाधीनंतर 111 वर्षांनी आता असं दिसतं टायटॅनिक! पाहा PHOTOS मधुपूर पिपरासोल निवासी असलेली नवजात बाळाचा आजी रेखा देवी यांनी सांगितलं, की क्लिनिकमध्ये तिच्या सुनेची प्रसूती केली गेली. जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हे बाळ जिवंत नसून त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी पुढे सांगितलं, की डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, अंत्यसंस्कारावेळीच नवजात बाळ अचानक रडू लागलं. यानंतर सर्वांनाच धक्का बसला. 44 वर्षानंतर तरुणीवरील बलात्काराचं आणि हत्येचं गूढ उलगडलं; DNA मुळे मोठा खुलासा कुटुंबीयांना समजलं, की ज्या बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं ते जिवंत आहे. या घटनेनंतर वैतागलेले नातेवाईक रुग्णालयात गेले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यासोबतच नातेवाईकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. नवजात बाळाला चांगल्या उपचारासाठी देवघर इथे घेऊन जाण्यात आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, संबंधित रुग्णालयाच्या संचालकांनी हे सर्व खोटं असल्याचा दावा केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: