मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

प्रेमासाठी कायपण! कॅनॉलमध्ये मारल्या उड्या, उसाच्या फडातही लपले; दीड वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या प्रेमीयुगुलाला अटक

प्रेमासाठी कायपण! कॅनॉलमध्ये मारल्या उड्या, उसाच्या फडातही लपले; दीड वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या प्रेमीयुगुलाला अटक

(File Photo)

(File Photo)

घरमालकाच्या अल्पवयीन मुलीसोबत (Minor Girl) प्रेमसंबंध जुळल्यानंतर (Love affair) पळून गेलेल्या एका प्रेमीयुगुलाला अखेर वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 18 जुलै: घरमालकाच्या अल्पवयीन मुलीसोबत (Minor Girl) प्रेमसंबंध जुळल्यानंतर (Love affair) पळून गेलेल्या एका प्रेमीयुगुलाला अखेर वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. क्राइम पेट्रोल मालिकेतील एका भागापासून प्रेरणा घेत दोघांनी मागील दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा दिला होता. मात्र एका सोशल मीडिया पोस्टमुळे संबंधित प्रेमीयुगुल पोलिसांच्या जाळ्यात अडकलं आहे. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीला पालकांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित 21 वर्षीय प्रियकर तरुण आपल्या आईसोबत वाळूज याठिकाणी भाडेकरू म्हणून राहात होता. दरम्यान त्याचं घरमालकाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यामुळे ते दीड वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर 2019 मध्ये राहत्या घरातून पळून गेले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली. पण प्रेमीयुगुल काही पोलिसांच्या जाळ्यात अडकलं नाही. मागील दीड वर्षांपासून ते कुटुंबीयांना आणि पोलिसांना गुंगारा देत होते.

हेही वाचा-हेडफोनवरून झाला वाद, भावाने बहिणीचा केला खून, अकोला हादरलं

पण एका सोशल मीडिया पोस्टमुळे संबंधित प्रेमीयुगुल वैजापूर याठिकाणी असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यासाठी दामिनी पथक त्याठिकाणी पोहोचलं असता, दोघांनी तब्बल तीन ते चार किलोमीटर पळत सुटले. त्यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी कॅनॉलमध्ये उड्या मारल्या. तसेच उसाच्या फडातही जाऊन लपले. पण अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संबंधित प्रेमीयुगुलांनी क्राइम पेट्रोलच्या एका भागापासून प्रेरणा घेत, फक्त सोशल मीडियासाठीच मोबाइलचा वापर मर्यादीत ठेवला होता.

हेही वाचा-44 वर्षानंतर तरुणीवरील बलात्काराचं आणि हत्येचं गूढ उलगडलं; DNA मुळे मोठा खुलासा

अटक झाल्यानंतरही, संबंधित मुलीनं 'कमी वयात प्रेम करणं गुन्हा आहे का? आम्ही काय चूक केली? असा सवाल उलट पोलिसांनाच विचारला आहे. आमचं दोघांवर जीवापाड प्रेम आहे, आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही, असंही मुलीनं पोलिसांना सांगितलं आहे. आई वडिलांकडून जेवढं प्रेम मिळालं नाही, तेवढं प्रेम मला मागील दीड वर्षात मिळालं आहे, आम्हाला सोडा साहेब...' असं भावनिक आवाहन मुलीनं पोलिसांना केलं होतं. पण पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून मुलीला पालकांच्या ताब्यात दिलं आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, Love story