जाहिरात
मराठी बातम्या / Viral / खुर्चीवर बसून आरामात काम करत होता व्यक्ती; इतक्यात मागून सरपटत आला विषारी साप अन्.., थरारक VIDEO

खुर्चीवर बसून आरामात काम करत होता व्यक्ती; इतक्यात मागून सरपटत आला विषारी साप अन्.., थरारक VIDEO

खुर्चीवर बसून आरामात काम करत होता व्यक्ती; इतक्यात मागून सरपटत आला विषारी साप अन्.., थरारक VIDEO

काही घटना इतक्या अजब असतात की त्या कॅमेऱ्यात कैद झाल्या नाहीत तर त्यावर विश्वास ठेवणंही कठीण जाईल. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Snake Video Viral) चांगलाच चर्चेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 मार्च : साप टीव्हीमध्ये किंवा प्राणिसंग्रहालयात दिसला तरीही अनेकांना घाम फुटतो. अशात साप थेट समोर आल्यावर तर काय अवस्था होईल, याची कल्पनाही घाबरून सोडणारी आहे. प्रत्येक साप विषारी नसला तरी सापाला पाहूनच थरकाप उडतो. सध्या अशीच स्थिती ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीची झाली. या व्यक्तीला कल्पनाही नव्हती ती साप अगदी त्याच्या जवळ पोहोचला आहे (Snake Crawls Near Man). स्टंट करण्यासाठी वेगात धावत आली पण पाय घसरला अन्…; Shocking Video काही घटना इतक्या अजब असतात की त्या कॅमेऱ्यात कैद झाल्या नाहीत तर त्यावर विश्वास ठेवणंही कठीण जाईल. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Snake Video Viral) चांगलाच चर्चेत आहे. न्यूज चॅनल एबीसी न्यूजने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑस्ट्रेलियातील एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो भीतीदायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जिप्सलँड येथील आहे. व्हिडिओमध्ये मालकम नावाचा एक व्यक्ती बाहेरच टेबल आणि खुर्ची घेऊन बसलेला दिसतो. तो आरामात आपलं काम करत असतो.

जाहिरात

इतक्यात या व्यक्तीला आपल्या पायाजवळ साप आल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये दिसतं की साप अतिशय मोठा आहे आणि तो सरपटत मालकमच्या खुर्चीकडे येऊ लागतो. हा व्यक्ती आपल्या कामाता व्यस्त आहे, त्यामुळे त्याला जराही चाहूल लागत नाही की साप त्याच्या किती जवळ आला आहे. अचानक साप मालकमच्या रोटेटिंग चेयरजवळ पोहोतचो आणि काही वेळात या व्यक्तीच्या पायावर चढू लागतो. यानंतर मालकमला जाणवतं की त्याच्या पायाजवळ काहीतरी आहे. हे पाहून तो पाय झटकतो. यानंतर साप लगेचच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागतो. मालकमही लगेचच घाबरून खुर्चीवरुन उठतो आणि सापाकडे बघत राहातो. पित्यानेच चिमुकल्याला दुसऱ्या मजल्याहून खाली फेकलं, मन सुन्न करणारा VIDEO ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, जी हैराण करणारी आहे. व्यक्तीने सर्वात आधी हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट रेडिटवर पोस्ट केला आणि सांगितलं की घटना जवळपास दोन आठवड्यांपूर्वीची आहे. जेव्हा साप त्याच्या घरात शिरला होता. मालकलने सांगितलं की त्याला वाटतं हा टायगर स्नेक होता. टायगर स्नेक अतिशय विषारी असतात आणि त्यांनी चावा घेतल्यास माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात