नवी दिल्ली 12 मार्च : दुर्घटना कधी घडेल, हे कोणालाच सांगता येत नाही. ते कधीही आणि कुठेही घडू शकतात. अनेकदा लोकांना याची मोठी किंमतही मोजावी लागते. अनेकदा तर यात लोकांचा जीवही जातो. नुकतंच अमेरिकेत अशीच एक मोठी दुर्घटना पाहायला मिळाली. यात एका इमारतीला आग लागली (Fire broke out in building) आणि एक लहान मुलगा आणि त्याचे वडील आतमध्ये अडकले. अखेर नाईलाजास्तव या पित्याला आपल्या मुलाला खाली फेकावं लागलं (Father Throws Child from 2nd Floor) . अरेरे! असं काय झालं की, लग्नात आलेल्या पाहुण्यांना धुवावी लागली ताटं;Video Viral न्यू जर्सीच्या साउथ रिज वुड अपार्टमेंटमध्ये 7 मार्चला ही घटना घडली. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, इमारतीत लाग लागल्यावर या पित्याला आणि त्याच्या मुलाला बाहरे पडता आलं नाही. बचाव पथक लगेचच घटनास्थळी दाखल झालं. मात्र दरवाजातून त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. यामुळे त्यांना खिडकीतूनच बाहेर काढावं लागलं.
Rescue captured on officers' body worn camera. Dad throws child out 2nd floor window to officers and firefighters, then jumps to escape flames consuming apartment building. pic.twitter.com/Ku5jQ6sOUy
— So Brunswick PD (@SoBrunswickPD) March 7, 2022
पोलीस आणि बचाव पथकासह तिथे असलेल्या इतर लोकांनी या व्यक्तीला आपल्या मुलाला खाली फेकण्यास सांगितलं. मात्र वडिलांना भीती होती की मुलाला गंभीर दुखापत होऊ नये. लहान मुलगा दुसऱ्या मजल्यावरुन कोसळल्यावर त्याला दुखापत होणं सहाजिक होतं. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने काळजावर दगड ठेवून पित्याला आपल्या मुलाला खाली फेकावं लागलं. खाली उभा असलेले पोलीस एकमेकांशेजारी उभा राहिले, जेणेकरून मुलाला खाली पडण्यापासून वाचवता येईल. जेव्हा एकट्या महाकाय गेंड्यावर तुटून पडला सिंहांचा कळप; शिकारीचा थरारक VIDEO यानंतर या सर्वांनी मिळून मुलाला हवेतच अगदी सहज पकडलं. यानंतर मुलाच्या वडिलांनाही दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Shocking Video) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की इमारतीला किती भीषण आग लागलेली आहे. ट्विटरवर So Brunswick PD नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओवर लोक कमेंट करून बचाव पथकाचं कौतुक करत आहेत.