स्टंट करण्यासाठी वेगात धावत आली पण पाय घसरला अन्...; Shocking Video
स्टंट करण्यासाठी वेगात धावत आली पण पाय घसरला अन्...; Shocking Video
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही तरुणी कशाप्रकारे पोजिशनमध्ये येते आणि संपूर्ण जोशात धावून स्टंट करण्याचा प्रयत्न करते. मात्र ती खुर्चीवर आपला पाय ठेवते, इतक्यात तिचा पाय घसरतो
नवी दिल्ली 12 मार्च : चित्रपटांमध्ये तसंच सोशल मीडियावर एकापेक्षा एक खतरनाक स्टंट पाहिल्यानंतर अनेकांना आपणही स्टंट करावा असं वाटू लागतं. लोकांना असं काहीतरी करायचं असतं, ज्यामुळे ते प्रसिद्धीझोतात येतील. मात्र चित्रपटांमध्ये अतिशय सावधगिरी बाळगून आणि भरपूर मेहनत घेऊन सराव करत स्टंट केले जातात. आजकाल युवकांमध्ये स्टंटची क्रेज जरा जास्तच असल्याचं दिसतं. फक्त तरुणच नाही तर तरुणीही अनेकदा स्टंट करताना पाहायला मिळतात.
अरेरे! असं काय झालं की, लग्नात आलेल्या पाहुण्यांना धुवावी लागली ताटं;Video Viral
सोशल मीडियावर सतत स्टंटचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Stunt Video Viral) होत असतात. यातील काही लोक यशस्वी ठरतात तर काहींसोबत स्टंटच्या नादात भलतंच काहीतरी घडतं. सध्या असाच एक व्हिडिओ (Funny Video Viral) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक तरुणी स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र पुढच्याच क्षणी तिच्यासोबत जे काही घडतं, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही तरुणी कशाप्रकारे पोजिशनमध्ये येते आणि संपूर्ण जोशात धावून स्टंट करण्याचा प्रयत्न करते. मात्र ती खुर्चीवर आपला पाय ठेवते, इतक्यात तिचा पाय घसरतो. यामुळे ती अचानक पुढच्या बाजूला झुकली. हा स्टंट तिच्यासाठी अतिशय जीवघेणाही ठरू शकत होता. कारण ज्या पद्धतीने ती पुढे झुकली ते पाहून जाणवतं की तिचा पायही तुटू शकत होता. यासोबतच तिच्या पाठीला आणि कमरेलाही भरपूर मार लागण्याची शक्यता होती.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर parkour_extreme_youtube नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 31 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 4 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने हा व्हिडिओ अतिशय भयानक असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, टिकटॉकने लोकांना आयुष्यच बदलवणाऱ्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित केलं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.