Home /News /viral /

टीप न देणाऱ्या ग्राहकाला पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं घडवली अद्दल; VIDEO होतोय व्हायरल

टीप न देणाऱ्या ग्राहकाला पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं घडवली अद्दल; VIDEO होतोय व्हायरल

एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा (Pizza Delivery Boy) एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे. यात पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनं ग्राहकाच्या पिझ्झा बॉक्समधून एक स्लाइस काढून घेतलं.

    नवी दिल्ली 27 जुलै: जेव्हा माणूस अगदी प्रामाणिकपणे आपलं काम करतो, मात्र त्याला त्याचं फळ मिळत नाही तेव्हा सहाजिकच वाईट वाटतं. मात्र, यावर काही पर्यायही नसतो. परंतु, काही लोक असेही असतात जे आपल्या हक्काची गोष्ट घेतातच. अशाच एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा (Pizza Delivery Boy) एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे. यात पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनं ग्राहकाच्या पिझ्झा बॉक्समधून एक स्लाइस काढून घेतलं. VIDEO: सांगलीकरांचा काही नेम नाही! चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात मेट्रोनं दिलेल्या वृत्तानुसार, Pizza Hut ड्रायवरचा हा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल (Tiktok Video) झाला आहे. यात दिसतं की डिलिव्हरी देणारा व्यक्ती पिझ्झा ठेवतो आणि मग तो पिझ्झाच्या बॉक्समधील एक स्लाइस काढून घेतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, दरवाजाच्या बाहेरच लिहिलं होतं, की टीप मिळणार नाही. तू एक स्लाइस घेऊ शकतो. यानंतर डिलिव्हरी बॉयनंही बॉक्समधून पिझ्झाचा एक तुकडा घेतला आणि आपलं मास्क काढून तो हा पिझ्झा खाऊ लागला. भयंकर! ट्रेनमध्येच महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून चक्रावून जाल ही संपूर्ण घटना डोरबेल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत म्हटलं, की जर तुम्ही टीप देऊ शकत नसाल तर तुम्ही काही ऑर्डरही करायला नाही पाहिजे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pizza, Video viral

    पुढील बातम्या