जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चालता चालता अचानक चवताळला शांत बैल...; त्यानंतर पुण्याच्या रस्त्यावर जे घडलं ते धडकी भरवणारं; पाहा VIDEO

चालता चालता अचानक चवताळला शांत बैल...; त्यानंतर पुण्याच्या रस्त्यावर जे घडलं ते धडकी भरवणारं; पाहा VIDEO

शांत असलेला बैल अचानक चवताळला.

शांत असलेला बैल अचानक चवताळला.

चालता चालता बैलाने जे केलं ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

  • -MIN READ Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 28 जानेवारी : तसा बैल हा आक्रमक स्वभावाचाच. जरी तो शांत असला तरी कधी काय करेल याचा नेम नाही. अशाच एका बैलाचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्याने शांत चालणारा बैल  चालता चालता अचानक चवताळला. त्यानंतर त्याने जे केलं ते धडकी भरवणारं आहे. पुण्या तील पिंपरी-चिंचवड मध्ये घडलेली ही धक्कादायक घटना. रस्त्यावरील हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओ अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. पिंपरी गावातील पिंपरी वाघेरे परिसरातील ही घटना. एक बैल रस्त्याने चालत होता. रस्त्याच्या अगदी मधोमध तो होता. त्याच्या मागून गाडीही येत होती. बैल हळूहळू अगदी शांतपणे रस्त्याने चालताना दिसतो आहे. पुढे काही लोक रस्त्याच्यामध्ये उभं राहून आपसात बोलत आहेत. हा बैल त्यांच्या दिशेने जातो. हे वाचा -  आ बैल मुझे मार! त्याच्या शिंगांना आग लावून छाती ताणून दिलं आव्हान; तरुणासोबत शेवटी भयानक घडलं दोन व्यक्ती पाठमोऱ्या उभ्या आहेत. बैल त्यांच्या जवळ जातो आणि त्यांना आपल्या शिंगावर धरून उडवून धाडकन जमिनीवर आपटतो.  दोन्ही व्यक्ती हवेत उडत खाली पडता. तिथं आसपास असलेले लोकही त्यांच्या मदतीसाठी धावून येतात. तिथं जवळच एक श्वानही दिसतो आहे. बैलाचं हे रूप पाहून तोसुद्धा घाबरतो. त्या व्यक्तींच्या जवळ येतो आणि काही वेळाने तिथून निघून जातो. बैल जेव्हा या व्यक्तींवर हल्ला करतो, त्याच वेळी एक स्कूल व्हॅनही तिथं येते. ही व्हॅन त्या बैलाला धडकणार तोच त्याचा ड्रायव्हर लगेच ब्रेक मारतो. त्यामुळे मोठा अपघात टळतो.  नंतर गाडी रस्त्याच्या कडेने निघून जाते. बैलही त्या दोन व्यक्तींशिवाय इतर दुसऱ्या कुणाला नुकसान पोहोचवत नाही. तोसुद्धा तिथून आपल्या मार्गाने निघून जातो.

जाहिरात

बैलाच्या या भयंकर हल्ल्यात दोघांपैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही व्यक्ती वयस्कर आहे. हे वाचा -  VIDEO - आधी हवेत उडवून जमिनीवर आपटलं नंतर खुपसत राहिला शिंगं; चवताळलेल्या रेड्याने तरुणाची केली भयंकर अवस्था दरम्यान रस्त्यावरील भटत्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचं पशुवैद्यकी विभाग या जनावरांकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात