मुंबई, 03 सप्टेंबर : बैल चवताळले की ते खतरनाक प्राण्यांपेक्षाही खतरनाक होतात. ते इतका भयानक हल्ला करतात की एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. बैलांच्या हल्ल्याचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही असे व्हिडीओ पाहिलेही असतील. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात एका व्यक्तीने बैलांच्या शिंगांना आग लावून मुद्दामहून त्याला आपल्याशी लढण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर बैलाने तरुणासोबत जे केलं ते धक्कादायक आहे. आ बैल मुझे मार अशी एक म्हण आहे. हेच या व्यक्तीने केलं. बैलाशी लढण्याची, बैलाला आपल्याशी फायटिंग करण्याचं चॅलेंज देण्याचं धाडस कुणीच करणार नाही. पण या व्यक्तीने ते केलं. आधी बैलांच्या शिंगांना आग लावली आणि त्यानंतर त्या बैलासमोर छाती ताणून उभं राहत या व्यक्तीने त्या बैलाला आपल्याशी लढण्याचं चॅलेंज दिलं. पुढे काय घडलं ते तुम्हीच या व्हिडीओत पाहा. हे वाचा - बापरे! एकाच वेळी 5-5 बैलांनी तरुणाला तुडवलं; खतरनाक हल्ल्याचा भयानक VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक काळ्या रंगाचा बैल दिसतो आहे. त्याच्या दोन्ही शिंगांना आग लावलेली आहे. त्याच्यासमोर एक व्यक्ती छाती ताणून उभा आहे. जो बैलाला डिवचताना दिसतो. आपल्याशी युद्ध करण्यासाठी तो बैलाला आव्हान देतो. सुरुवातीला बैल त्या व्यक्तीकडे एकटक शांतपणे पाहत राहतो आणि जशी ती व्यक्ती माती बैलाकडे फेकते तसा बैल चवताळतो आणि तो त्या व्यक्तीवर हल्ला करतो.
व्यक्तीच्या मागे जिने आहेत. जसा बैल त्याच्यावर हल्ला करायला जातो तशी ती व्यक्ती त्या जिन्यांवर धावून लागते. बैलही त्याच्या मागेमागे धावतो आणि जसे ते दोघं वर पोहोचतात. तसा बैल त्याला आपल्या पेटलेल्या शिंगांमध्ये धरतो आणि हवेत उडवून फेकून देतो. ती व्यक्ती जिन्यांच्या खाली येत जमिनीवर धाडकन आपटते. त्या व्यक्तीला उठणंही शक्य होत नाही. हे वाचा - VIDEO - श्वानावर काठी उगारताच ऑन द स्पॉट मुलाला…; मुक्या जीवाला मारण्याची मिळाली भयानक शिक्षा @Menliveless ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.