मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - आधी हवेत उडवून जमिनीवर आपटलं नंतर खुपसत राहिला शिंगं; चवताळलेल्या रेड्याने तरुणाची केली भयंकर अवस्था

VIDEO - आधी हवेत उडवून जमिनीवर आपटलं नंतर खुपसत राहिला शिंगं; चवताळलेल्या रेड्याने तरुणाची केली भयंकर अवस्था

रेड्यांच्या स्पर्धेत एका रेड्याने तरुणावर खतरनाक हल्ला केला आहे.

रेड्यांच्या स्पर्धेत एका रेड्याने तरुणावर खतरनाक हल्ला केला आहे.

रेड्यांच्या स्पर्धेत एका रेड्याने तरुणावर खतरनाक हल्ला केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India

मुंबई, 09 ऑगस्ट : बैल, रेडा हे प्राणी पाळले जात असले तरी ते आक्रमक आहेत. म्हणजे कधी कुणावर हल्ला करतील सांगू शकत नाही. असे ते शांत असतात पण चवताळले तर एखाद्याचा जीवही घेऊ शकतात. त्यामुळे अशा प्राण्यांशी पंगा घेणं चांगलंच महागात पडू शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. रेड्यांच्या स्पर्धेत एका रेड्याने तरुणावर खतरनाक हल्ला केला आहे.

काही देशांमध्ये रेड्यांच्या स्पर्धा आयोजिक केल्या जातात. अशाच स्पर्धेचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता दोन रेडे मध्ये रस्त्यावर उभे दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी प्रेक्षक उभे आहेत. एक तरुण हातात निळा कपडा घेऊन या रेड्यांच्या समोर येतो आणि हे असं त्यांच्यासमोर ओरडतो. कदाचित रेड्यांची ही पळण्याची स्पर्धा आहे. रेडे एकाच जागी थांबले होते म्हणून हा तरुण त्यांना स्पर्धा सुरू करण्याचा इशारा देत होता. पण रेड्यांसोबतचा हा खेळ त्याला चांगलाच महागात पडला.

जसं त्याने हे म्हटलं तसं एक रेडा इतका चवताळला की तो धावत आला. त्याला धावत येताना पाहून तरुण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जातो आणि प्रेक्षकांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो पण तो वर जाणार तोवर रेडा त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याला आपलाय दोन्ही शिंगावर धरून हवेत उडवतो त्यानंतर जमिनीवर धाडकन आपटतो.

हे वाचा - एकमेकांवर तुटून पडले सिंह आणि क्रोबा; 2 किंगच्या फायटिंगमध्ये कोणी मारली बाजी पाहा VIDEO

रेडा इतका भयानक पद्धतीने हल्ला करतो की त्याचं रौद्र रूप पाहून त्याच्यासोबत असलेला दुसरा रेडाही घाबरून तिथून पळ काढतो.  त्यानंतर सर्वजण ओरडू लागतात. हाताला मिळेल ते त्या रेड्यावर मारून त्याला तरुणापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण रेडा काही तरुणाला सोडत नाही. आपली शिंग त्या तरुणाच्या शरीरात घुसवण्याचा प्रयत्न करतो. शिंगांखाली त्याला चिरडत राहतो. तरुण सुटण्यासाठी धडपड करतो. पण रेडा त्याला सुटू देत नाही. त्यानंतर त्याच्या मदतीसाठी दोघंजण तिथं येतात. एक व्यक्ती हातात गुलाबी रंगाचं कापड घेऊन येतं आणि ते रेड्यासमोर नेऊन झळकावतं. तेव्हा कुठे तो रेडा शांत होतो आणि तरुणाला सोडून तिथून पळून जातो.

रेड्याने तरुणाची इतकी भयंकर अवस्था केली ही पाहूनच धडकी भरते. त्याच्या अंगावर कपडेही नीट राहिले नाहीत. काही लोक त्याला उचलतात आणि एका गाडीवर नेतात. त्याला आपल्या शरीराची हालचालही करता येत नाही आहे. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

हे वाचा - स्टाइलमध्ये गजराजासोबत सेल्फी काढायला गेले तरुण; संतप्त हत्तींच्या कळपाने त्यांना...; Watch Video

हा व्हिडीओ नेमका कुठला, कधीचा आहे हे माहिती नाही. Crazy Tweets ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bull attack, Pet animal, Shocking viral video, Viral, Viral videos