• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: लग्नातील शूट करतानाच ढसाढसा रडू लागला फोटोग्राफर, नेमकी भानगड काय?

VIDEO: लग्नातील शूट करतानाच ढसाढसा रडू लागला फोटोग्राफर, नेमकी भानगड काय?

सोशल मीडियावर (Social Media) सध्या लग्नातील असाच व्हिडिओ व्हायरल (Wedding Video) झाला आहे. यात नवरदेव आणि नवरी (Bride and Groom) नाही तर तिसऱ्याच व्यक्तीनं संपूर्ण लक्ष वेधलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 07 ऑगस्ट : भारतातील लग्नसमारंभ हे एखाद्या सणापेक्षा कमी नसतात. यात प्रत्येक प्रकारचा आनंद, हास्य असे वेगवेगळे क्षण असतात. मात्र, काही लग्नांमध्ये आपल्या भूतकाळातील गोष्टींमध्ये आणि अनुभवांमध्ये रमलेले लोकं मात्र लग्नातही उदासच असतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या लग्नातील असाच व्हिडिओ व्हायरल (Wedding Video) झाला आहे. यात नवरदेव आणि नवरी (Bride and Groom) नाही तर तिसऱ्याच व्यक्तीनं संपूर्ण लक्ष वेधलं आहे. लग्न होताच नवरीसोबत Cheating करू लागला नवरदेव; तिसरीनंच पकडला हात अन्.., VIDEO प्रत्येक लग्नातील क्षण आणि कार्यक्रम कैद करणाऱ्यासाठी फोटोग्राफर (Wedding Photographer) आणि व्हिडिओग्राफर (Videographer) बोलावले जातात. हे लोकं दिवसरात्र एक करून लग्नातील सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद (Wedding Photoshoot) करत असतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरी अन् नवरेदव नाही तर फोटोग्राफर रडताना दिसत आहे. प्रत्येक क्लिकनंतर तो आपले अश्रू पुसत असल्याचं दिसत आहे.
  VIDEO: सखी बसमध्ये बसलेल्या पुरुषाची अजब प्रतिक्रिया पाहून पोट धरून हसाल हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 11 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर यूजर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. काहींचं असं म्हणणं आहे, की हा व्हिडिओ वारंवार पाहावासा वाटतोय. या व्हिडिओमध्ये फोटोग्राफर नेमका का रडतोय? हे समजू शकलेलं नाही. तो आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्याच लग्नाचं शूटिंग करत आहे, की इतर कोणत्या कारणामुळे दुःखी आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: