जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'सखी' बसमध्ये बसलेल्या पुरुषाची अजब प्रतिक्रिया पाहून पोट धरून हसाल, व्हायरल होतोय Video

'सखी' बसमध्ये बसलेल्या पुरुषाची अजब प्रतिक्रिया पाहून पोट धरून हसाल, व्हायरल होतोय Video

'सखी' बसमध्ये बसलेल्या पुरुषाची अजब प्रतिक्रिया पाहून पोट धरून हसाल, व्हायरल होतोय Video

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहायला मिळतं, की कानपूरच्या बस स्थानकात गुलाबी रंगाची सखी बस उभा आहे. स्थानिक प्रवासासाठी चालवली जाणारी ही बस केवळ महिलांसाठी आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) सतत काही ना काही नवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ अत्यंत इमोशनल असतात, असे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळेही पाणावतात. तर काही व्हिडिओ इतके विनोदी असतात की हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Funny Video Viral) पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. महिलांसाठी असलेल्या स्पेशल बसमध्ये (Ladies Special Bus) बसलेल्या एका व्यक्तीला रिपोर्टरनं जेव्हा सवाल केला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. VIDEO - व्हिलचेअरसह रेल्वे ट्रॅकवर पडली अपंग व्यक्ती; धडधड करत आली ट्रेन आणि… व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की कानपूरच्या बस स्थानकात गुलाबी रंगाची सखी बस उभा आहे. स्थानिक प्रवासासाठी चालवली जाणारी ही बस केवळ महिलांसाठी आहे. मात्र, काही पुरुषही काहीही विचार न करता यात बसताना दिसतात. कोणीतरी हे दृश्य पाहताच याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ आरजे पुरबनं स्वतः रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

VIDEO - या मुंबई पोलिसाच्या डान्सचा जलवा पाहाच; दबंग सलमानही यांच्यासमोर फेल व्हिडिओ शूट करणाऱ्यानी जेव्हा महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या सखी बसच्या आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा आतमध्ये काही पुरुष बसलेले होते. या व्यक्तीनं पाहून त्यानं मस्करीत विचारलं, की दीदी कुठे जात आहात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 1 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या मजेशीर व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात