Home /News /viral /

लग्न होताच नवरीसोबत Cheating करू लागला नवरदेव; तिसरीनंच पकडला हात अन्.., पाहा VIDEO

लग्न होताच नवरीसोबत Cheating करू लागला नवरदेव; तिसरीनंच पकडला हात अन्.., पाहा VIDEO

सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचा हा व्हिडिओ (Viral Video of Bride and Groom) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजतं की लग्नानंतर काही वेळातच हा शूट केला गेला आहे

  नवी दिल्ली 07 ऑगस्ट : प्रत्येकाच्या घरात लग्नाच्या काही खास आणि वेगळ्या प्रथा (Wedding Ritual) तसंच कार्यक्रम असतात. काही प्रथा तर इतक्या वेगळ्या असतात, की त्याबाबत अनेकांनी माहितीही नसतं. सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका नव्या नवरीचा आणि नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride and Groom) होत आहे. यात लग्नानंतर सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये नवरदेव चीटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अत्यंत विनोदी (Funny Video of Groom) आहे. पाहुण्यांसमोरच नव्या नवरीचा पतीसोबत रोमान्स; पाहा कपलचा Romantic Video सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजतं की लग्नानंतर काही वेळातच हा शूट केला गेला आहे. यात नवरदेव लग्नानंतर प्रथेप्रमाणे खेळला जाणारा एक खेळ खेळताना दिसत आहे. यात त्याला केवळ आपल्या एका हातानं नवरीच्या हातात बांधलेला धागा सोडायचा आहे. मात्र, हे त्याच्यासाठी अवघड काम आहे.
  स्विमिंग पूलखाली NASA ने वसवलं दुसरं जग, पाण्याच्या आत घर, रस्ते आणि गाड्या! जेव्हा नवरदेव एका हातानं नवरीच्या हातात बांधलेला धागा सोडू शकला नाही तेव्हा त्यानं आपल्या दोन्ही हातांचा वापर करण्यास सुरुवात केली. इतक्यात शेजारी बसलेल्या महिलेनं त्याचा हात पकडला, जेणेकरून त्यानं एकाच हातानं तो धागा सोडावा. या व्हिडिओ दिलेल्या कॅप्शनमध्ये विचारलं गेलं आहे, की किती लोकांना लग्नातील ही सुंदर प्रथा माहिती आहे? इन्स्टाग्रामवर शेअर केला गेलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 94 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bridegroom, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या