Home /News /viral /

'मिल्क शेक मॅगी'चा इंटरनेटवर धुमाकूळ; पाहा नेमकी काय आहे भानगड

'मिल्क शेक मॅगी'चा इंटरनेटवर धुमाकूळ; पाहा नेमकी काय आहे भानगड

सध्या सोशल मीडियावर (Social Media) मॅगीचा एक फोटो व्हायरल Maggi viral photo) होत आहे. हा फोटो मसालेदार मॅगीचा नसल्यानं अनेकांना तो निराश करत आहे

    नवी दिल्ली 15 सप्टेंबर : आजकाल मॅगी (Maggi) हा बहुतेकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पदार्थच बनला आहे. 2 मिनिटात तयार होणारी ही मॅगी घाईच्या वेळी अनेकांसाठी पोट भरण्याचं उत्तम साधन आहे. नोकरी करणारे किंवा रात्री उशिरापर्यंत जागणारे लोक भूक लागताच अर्ध्या रात्रीही मॅगी बनवून खातात. त्यामुळे ही मॅगी अनेकांसाठी खास आहे. अशात जर कोणी मॅगीचा अपमान केला तर ‘कौन हैं ये लोग और कहां से आते हैं!’ हा प्रश्न आपोआपच पडतो. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. "Work From Home बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल"; हर्ष गोयंकांना महिलेची विनंती सध्या सोशल मीडियावर (Social Media) मॅगीचा एक फोटो व्हायरल (Maggi viral photo) होत आहे. हा फोटो मसालेदार मॅगीचा नसल्यानं अनेकांना तो निराश करत आहे, तर काहींना हा फोटो पाहूनच किळस येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो मॅगी मिल्क शेकचा (Maggi Milk Shake Photo) आहे. इंटरनेटवर एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात दोन कप मिल्क शेक दिसत आहे आणि यावर आईस्क्रीमच्या जागी टॉपिंगच्या रुपात मॅगी ठेवली गेली आहे. हा फोटो पाहून नेटकरी इतके भावुक झाले आहेत की हे बनवणाऱ्यालाच दोष देत आहेत. अनेकांनी हा फोटो पाहून मिर्जापूर वेबसीरिजमधील ‘मकबूल, जिंदा पकड़ना है इसे बनाने वाले को’ हा डायलॉग कमेंट केला आहे. तर, काहींनी अरशद वार्सीच्या जॉली एलएलबीमधील मीम शेअर केलं आहे, यात तो म्हणत आहे - ‘कौन हैं ये लोग और कहां से आते हैं!’ थेट सफारी गाडीवरच चढला चित्ता आणि...; नॅशनल पार्कमधील धडकी भरवणारा VIDEO VIRAL हेच कमी होतं की काय, अशात आता आणखी काही लोकांनी पारले जी सँडविचचा फोटो शेअर केला आहे. यात बिस्कीटाच्या मध्ये भेंडीची भाजी ठेवली गेली आहे. या अजब डिशवर आलेले लोकांचे मीम अतिशय मजेशीर आहेत. यावर आलेल्या कमेंटच लोकांचं अधिक मनोरंजन करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Tasty dishes, Viral news

    पुढील बातम्या