केपटाऊन, 14 सप्टेंबर : सिंह, वाघ, बिबट्या, चित्ता (Cheetah) असे प्राणी पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते. त्यासाठीच किती तरी जण जंगल सफारी (Jungle safari) किंवा नॅशनल पार्कमध्ये (National park) जातात. पण अगदी दूरवरूनसुद्धा हे प्राणी दिसले की धडकीच भरते. सफारी गाड्यातून या प्राण्यांना अगदी जवळून पाहायलाही मिळतं. काही वेळा हे प्राणी स्वतःच गाड्यांजवळ येतात. अशाच एका गाडीजवळ आलेल्या चित्त्याचा (Cheetah on safari vechicle) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहे. नॅशनल पार्कमध्ये एका चित्त्याने चक्क सफारी गाडीवरच उडी घेतली आहे. फक्त व्हिडीओ पाहून आपल्याला घाम फुटतो, तर या गाडीतल्या पर्यटकांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना आपण करूच शकतो.
During a safari in the Serengeti, a cheetah mom jumped onto the safari vehicle! 😱🐆🚙#viralhog #safari #cheetah #closeencounter #Serengeti pic.twitter.com/WSBfrrrWTA
— ViralHog (@ViralHog) September 8, 2021
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक चित्ता गाडीजवळ येतो आणि डोकावून पाहतो. त्यानंतर तो उडी मारून गाडीवर चढतो. गाडीवर पूर्णपणे फिरतो. हे वाचा - बापरे! हे काय आहे? कारमधील कचऱ्यात दिसलं असं काही की पाहूनच फुटेल घाम गाडी पूर्ण बंदिस्त आहेत. पण गाडीला सर्व बाजूंनी काचा असल्याने त्यातून चित्ता स्पष्ट दिसतो आहे. चित्त्याला गाडीवर चढलेलं पाहून गाडीच्या आत असलेल्या पर्यटकांची हवा टाईट होते. या महिलेने आपला कॅमेरा ऑन करून त्यात गाडीवर चढलेल्या या चित्त्याचं दृश्यं टिपलं. त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. पण त्याच वेळी ती घाबरलेलीसुद्धा दिसते आहे. ती कॅमेऱ्याकडे पाहून हळू आवाजात बोलते आहे. शिवाय चित्त्याला आपण दिसणार नाही, याचीही ती काळजी घेते आहे. थोड्या वेळाने बिबट्या गाडीवरून उतरतो आणि तिथून दूर पळत जातो. हे वाचा - VIDEO: खरी मैत्री; कुत्र्याला वाचवण्यासाठी मांजरीनं केलेलं काम पाहून नेटकरी थक्क व्हायरल हॉग ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य आफ्रिकेच्या सेरेनगेती नॅशनल पार्कमधील आहे.