नवी दिल्ली, 14 सप्टेंबर: कोरोनामुळे सध्या बऱ्याच कंपन्यांचं वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू आहे. त्यात संपूर्ण कुटुंब घरी आहे. नवरा आणि मुलं सर्वच जण घरी असल्यामुळे गृहिणींच्या डोक्याचा ताप वाढला आहे. सतत घरची कामं करून महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय. कोरोनामुळे कंपन्या WFH बंद करण्याचा निर्णय घेत नाहीये. मात्र RPG ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांच्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं थेट गोयंकांना एक विनंती केली आहे. बातमी ‘एनडीटीव्ही’ नं प्रकाशित केली आहे. “Work From Home बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल” अशा आशयाची विनंती तिनं गोयंकांना केली आहे. तिची ही विनंती बघून गोयंकांनाही यावर उत्तर काय द्यावं हा प्रश्न पडला आहे. काय आहे महिलेची विनंती “Work From Home बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल , माझा नवरा दिवसातून दहा वेळा कॉफी पितो”. घरून काम करत असताना, वेगवेगळ्याखोल्यांमध्ये देखील स्विच करतो आणि आम्हाला गोंधळात टाकतो". एवढंच काय, तो “सतत जेवण मागतो”आणि मी त्याला ऑफिसच्या कॉल दरम्यान झोपलेलं देखील पाहिलं आहे". हे वाचा - मोठी बातमी! देशातील ‘या’ टॉप IT कंपन्यांचं Work From Home होणार बंद; बघा लिस्ट
Don’t know how to respond to her….😀 pic.twitter.com/SuLFKzbCXy
— Harsh Goenka (@hvgoenka) September 9, 2021
इतकंच नाही तर “मला आधीच दोन मुलं आहेत ज्यांची काळजी मलाच घ्यावी लागते त्यामुळे मी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करते” अशा तीच्या मेसेजच्या शेवटच्या दोन ओळी होत्या. या महिलेचा हा मेसेज हर्ष गोयंकांनी ट्विट केला आणि “आता मी यावर काय उत्तर द्यावं” असं त्यासोबत पोस्ट केलं. या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेकांनी अनेक निरनिराळे गंमतीशीर कमेंट्स केले. एकूणच काय तर वर्क फ्रॉम होममुळे महिलांना किती वैताग आला आहे हे या महिलेच्या विनंतीवरून समजलं. .