मराठी बातम्या /बातम्या /Viral /या बापाचं प्रेम पाहून येईल डोळ्यात पाणी; भर पावसात मुलीच्या अभ्यासाठी छत्री घेऊन राहिला उभा

या बापाचं प्रेम पाहून येईल डोळ्यात पाणी; भर पावसात मुलीच्या अभ्यासाठी छत्री घेऊन राहिला उभा

एक मुलगी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपला अभ्यास करत आहे. मात्र, तिच्या अभ्यासात अडथळा येऊ नये आणि ती भिजू नये यासाठी वडील तिच्या डोक्यावर छत्री धरून उभा (Father Holds Umbrella as Daughter Attends Online Class Amid Heavy rain) आहे.

पुढे वाचा ...

बंगळुरु 20 जून: सोशल मीडियावर सतत नवनवे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत राहातात. मात्र, यातील काही फोटो असे असतात जे सगळ्यांचीच मनं जिंकून घेतात. सध्या अशाच एका फोटोनं (Viral Photo) इंटरनेटच्या जगात धुमाकूळ घातला आहे. हा फोटो पाहून प्रत्येकालाच अभिमान वाटेल. या फोटोमध्ये पाहायला मिळतं, की बाहेर पाऊस सुरू असताना एक मुलगी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपला अभ्यास करत आहे. मात्र, तिच्या अभ्यासात अडथळा येऊ नये आणि ती भिजू नये यासाठी वडील तिच्या डोक्यावर छत्री धरून उभा (Father Holds Umbrella as Daughter Attends Online Class Amid Heavy rain) आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक याचं भरभरुन कौतुक करत आहेत.

हा व्हायरल फोटो कर्नाटकच्या मलनाड परिसरातील सुलिया येथील आहे. महेश पुच्चापडी नावाच्या एका फोटो जर्नालिस्टनं हा फोटो क्लिक केला आहे. त्यांनी सांगितलं, की ही मुलगी रोज संध्याकाळी 4 वाजता आपल्या SSLC क्लाससाठी याच ठिकाणी येऊन बसते. सुलियामधीस सर्वच विद्यार्थ्यांना नेटवर्कसंबंधीच्या समस्यांमुळे उंच डोंगरांवर किंवा उंच जागेंवर जाऊन अभ्यास करावा लागतो किंवा कुठेतरी बाहेर जाऊन बसावं लागतं.

VIDEO: चिमुकल्याचा उदारपणा! गरीब मुलाला दिली स्वतःची खेळणी, मिळून खाल्ले चिप्स

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं हा फोटो पाहिल्यानंतर लिहिलं, की खरंच हे सुंदर दृश्य जगातील प्रत्येकाचं मन जिंकणारं आहे. तर, दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, की पालक आपल्या मुलांसोबत कोणत्याही गोष्टीचा पर्वा करत नाहीत. त्यांना फक्त आपल्या मुलांची काळजी असते. आणखी एका युजरनं लिहिलं, की खरंच असे क्षण कोणाला विसरू वाटतील.

‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच

कर्नाटकमध्ये सध्या दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रीय असल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. नेटवर्कसंबंधीच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लाससाठी बरंच दूर जावं लागत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना जिथे नेटवर्क मिळेल, तिथेच ते बसत आहेत. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन पद्धतीनंच विद्यार्थ्यांचे क्लास होत आहेत.

First published:

Tags: Emotional, Father, Online exams, Viral photo