नवी दिल्ली 20 जून : सोशल मीडियावर सतत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अतिशय इमोशनल (Emotional Video) असतात, हे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे .डोळेही पाणवतात. तर, काही व्हिडिओ चेहऱ्यावर हसू घेऊन येतात. मात्र, अनेकदा या व्हिडिओच्या माध्यमातून अशा घटना पाहायला मिळतात, ज्या पाहून तुमचा माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ होत जातो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की सफाई करणाऱ्या एका मुलासोबत कारमधील चिमुकल्यानं असं काही केलं, जे पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. वाशिममधील जोडप्यानं 22 दिवसात खोदली 20 फूट विहिर, संपूर्ण गावाची भागवणार तहान व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की कार साफ करणारा एक लहान मुलगा रस्त्यावर उभा असतो. इतक्यात लाल सिग्नल पडतो आणि एक कार या मुलाशेजारी येऊन थांबते. या कारमध्ये याच मुलाच्या वयाचा एक चिमुकला बसलेला असतो. कारमधील मुलगा आपल्या गाडीची काच खाली घेतो आणि या रस्त्यावर उभा असलेल्या मुलासोबत बोलू लागतो. यानंतर कारमधील मुलगा आपली खेळणी या मुलाला खेळण्यासाठी (Boy Gave His Toys to Car Cleaner देतो. यानंतर कार साफ करणारा मुलगा जेव्हा ही खेळणी कारमधील मुलाला परत करू लागतो, तेव्हा तो ती घेण्यास नकार देतो. यानंतर कार साफ करणारा मुलगा तिथून जातो आणि शेजारीच असलेल्या दुकानातून चिप्सचं पॅकेट घेऊन या कारमध्ये बसलेल्या मुलाला खाण्यासाठी देतो. यानंतर दोघंही या चिप्सच्या पॅकेटमधील चिप्स खाऊ लागतात. सिग्नल ग्रीन होतात कार पुढे जाऊ लागते, तेव्हा दोघंही एकमेकांना बाय करतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“We make a living by what we get, but we make a life by what we give.”
— Vala Afshar (@ValaAfshar) June 19, 2021
Watch this beautiful exchange between these two wonderful young men; the very best example of character, generosity and mutual respect. https://t.co/g7QkuYkU2z
माझा लेक गेला, दुसऱ्याच दिवशी आईनेही सोडले प्राण, कन्नडमधील घटना वाला अफसर या व्यावसायिकानं हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर कमेंटही करत आहेत. अनेकजण कारमध्ये बसलेल्या मुलाच्या माणुसकीचं आणि त्याच्या उदारपणाचं कौतुक करत आहेत.