Home /News /viral /

पतीपासून बचावासाठी खिडकीतून उडी घेताना दिसली गरोदर महिला; इंटरनेटवर व्हायरल होतोय Photo

पतीपासून बचावासाठी खिडकीतून उडी घेताना दिसली गरोदर महिला; इंटरनेटवर व्हायरल होतोय Photo

सध्या एक अशी घटना आणि त्या घटनेचे फोटो (Shocking Photos Viral) समोर आले आहेत, जे पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

    नवी दिल्ली 18 सप्टेंबर : कपलमध्ये अनेकदा वाद (Dispute Between Couple) होत राहतात , मात्र ते आपल्या समस्यांवर स्वतःच काहीतरी मार्ग काढून हा वाद मिटवत असतात. मात्र, जे लोक योग्य मार्ग काढण्यात अपयशी ठरतात, त्यांचं नातंही फार काळ टिकत नाही. सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा कपलच्या रिलेशनशिप इश्यूबाबतच्या (Relationship Issue) बातम्या समोर येत असतात. मात्र, सध्या एक अशी घटना आणि त्या घटनेचे फोटो (Shocking Photos Viral) समोर आले आहेत, जे पाहून सगळेच हैराण झाले आहेत. यात एका कपलचा वाद इतका वाढला की आपल्या पतीपासून वाचण्यासाठी गरोदर महिला (Pregnant Woman) घराच्या खिडकीमधून बाहेर उडी घेताना दिसली. मास्क न घातल्यानं पोलिसांनी दिली अजब शिक्षा; महिलेला कपडे काढायला लावले अन्.... ही घटना ब्राझीलमधील (Brazil) आहे. ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये 14 सप्टेंबरला असं दृश्य पाहायला मिळालं ज्यानं सर्वांनाच हैराण केलं. यात मारिया जोस नावाची 12 आठवड्यांची गरोदर महिला आपल्या अपार्टमेंटच्या खिडकीतून खाली उडी मारताना दिसली. यात तिचा पार्टनर विटर बटिस्टा तिला पकडताना दिसत आहे. समोरच्या इमारतीतील एका व्यक्तीनं या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला स्वतःचा बचाव कऱण्यासाठी खिडकीतून उडी मारताना दिसते, मात्र तिचा पार्टनर तिला पकडून आतमध्ये ओढतो आणि खिडकीचे पडदे बंद करतो. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ही पहिली वेळ नाही की मारिया आपल्या नवऱ्यापासून वाचण्यासाठी खिडकीतून उडी मारत होती. दोघांच्या नात्याला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. याच वर्षी मे महिन्यात या महिलेनं पोलिसांत तक्रार करत म्हटलं होतं, की तिचा पार्टनर तिला नेहमी मारहाण करतो. महिलेचा पार्टनर एक वेल्डर आणि कॅब ड्रायव्हर म्हणून काम करतो. महिलेनं सांगितलं, की तो अतिशय घाणेरड्या विचारांचा माणूस आहे. तो महिलेला एकटं बाहेरही जाऊ देत नाही. Girlfriend साठी त्याने बनवले असे नियम, वाचून तुम्हालाही धक्का बसेल! मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या एक दिवस आधीच महिलेनं कागदावर लिहून मदतीची मागणी करत हा कागद खाली फेकला होता. मात्र, ही नोट महिलेच्या पार्टनरनं पाहिली. समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीनं या घटनेचा व्हिडिओ शूट केला त्यानं पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी महिलेच्या पार्टनरला अटक केली आहे. महिलेनं म्हटलं, की तिला नेहमी आशा होती की तिच्या पार्टनरचा स्वभाव बदलेलं. मात्र, त्याच्यात काहीच बदल झाली नाही आणि तो नेहमीच तिला मारहाण करत राहिला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral news, Viral photo

    पुढील बातम्या