जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चिमुकलीवर हल्ला करत होती मेंढी; पाळीव श्वानाने धावत येत असा वाचवला जीव, पाहा VIDEO

चिमुकलीवर हल्ला करत होती मेंढी; पाळीव श्वानाने धावत येत असा वाचवला जीव, पाहा VIDEO

चिमुकलीवर हल्ला करत होती मेंढी; पाळीव श्वानाने धावत येत असा वाचवला जीव, पाहा VIDEO

एका कुत्र्याने हल्ला करणाऱ्या मेंढीपासून एका लहान मुलीचा बचाव करत तिचा जीव वाचवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा श्वान लहानपणापासून त्या मुलीच्या घरात पाळला गेलेला नव्हता, तर त्याला नुकतंच आणलं गेलं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 23 डिसेंबर : माणूस अनेकदा कुत्र्यांना घाबरतो, त्यांचा तिरस्कार करतो किंवा वाईट वागतो पण कुत्रा माणसाच्या प्रेमात पडला तर तो मरेपर्यंत त्याचं रक्षण करतो. याचंच उत्तम उदाहरण तुम्हाला एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ज्यात एका कुत्र्याने हल्ला करणाऱ्या मेंढीपासून एका लहान मुलीचा बचाव करत तिचा जीव वाचवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा श्वान लहानपणापासून त्या मुलीच्या घरात पाळला गेलेला नव्हता, तर त्याला नुकतंच आणलं गेलं होतं. VIDEO: अचानक दुचाकीस्वारासमोर येऊन उभा राहिला वाघ अन्…, पुढं जे घडलं ते थक्क करणारं व्हायरल हॉग या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका कुत्र्याने एका लहान मुलीचा जीव वाचवला, तोही एका मेंढीपासून. मेंढी हा तसा शांत प्राणी आहे आणि त्या माणसांना घाबरतातही. परंतु जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हा ते त्यांच्या डोक्याने जोरदार हल्ला करून कोणालाही जखमी करू शकतात. व्हिडिओमध्येही तेच पाहायला मिळत आहे.

जाहिरात

व्हिडिओमध्ये एक बाग दिसत आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगी आणि मेंढी दिसत आहेत. मुलगी मेंढीला स्पर्श करत आहे आणि मेंढी बाजूला शांतपणे उभा आहे. पण अचानक या प्राण्याने त्या मुलीला डोक्याने ढकलायला सुरुवात केली आणि नंतर त्या धक्क्याची तीव्रता वाढली. यामुळे मुलगी पुन्हा पुन्हा खाली पडते. मेंढीला पाहून असं वाटतं की ती हल्ला करण्याच्या मूडमध्ये आहे, परंतु अचानक पाळीव कुत्रा तिथे धावत येतो आणि मेंढीचा पाठलाग करतो. हा कुत्रा मेंढीला मुलीपासून दूर करत तिचा बचाव करतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की - “या दत्तक कुत्र्याने एका चिमुरडीचे प्राण वाचवले.” जेव्हा झोपलेल्या वाघाजवळ पोहोचला कुत्रा; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून ४ हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे. यावर नेटकरी प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने यावर कमेंट करत लिहिलं, की श्वानाने केलेलं काम कौतुकास्पद आहे. मात्र, ही या मुलीच्या आई-वडिलांची चूक आहे की त्यांनी तिला एकटं सोडलं. दुसऱ्या यूजरने म्हटलं की नक्कीच हीचे आई-वडील झोपलेले असतील. आणखी एकाने यूजरने लिहिलं की कुत्र्याच्या जागी मांजर असती तर ती कधीच या मुलीच्या बचावासाठी आली नसती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात