मुंबई 21 डिसेंबर : सोशल मीडियावर प्राण्यांसंबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे प्राण्यांच्या क्युट रिएक्शनचे असतात. तर काही व्हिडीओ हे जंगलातील क्रुरता दाखवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो खूपच भयानक आहे. हा व्हिडीओ वाघ आणि कुत्र्यासंबंधीत आहे. नुसतं वाघाचं नाव घेतलं तरी देखील आपल्याला धडकी भरते. त्यात या कुत्र्याने वाघ बघीतला. मग काय जे व्हायचं तेच झालं. हे ही पाहा : तुम्ही देखील लहान मुलांना स्कुटीच्या समोर उभं करता का? मग हा Video नक्की पाहा खरंतर झाडाच्या सावलीत वाघ शांतपणे झोपला होता, पण समोर चालून आलेला शिकार तो तरी कशाला सोडणार? खरंतर वाघाला पाहाताच कुत्रा दचकला, त्याला काय करावे हे सुचण्या आताच, वाघाला जाग आली आणि त्याने कुत्र्याला पाहिलं आणि कसलाही वेळ न घालवता, त्याने थेट कुत्र्याच्या मानेचा चावा घेतला. हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. जो पाहून तुम्हाला देखील धडकी भरेल. इंटरनेटवर हा व्हिडीओ Ankur Rapria, IRS या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स देखील केल्या आहेत.
Don't take a sleeping tiger so lightly.
— Ankur Rapria, IRS (@irsankurrapria) June 30, 2022
T120 tiger from Ranthambore aka killing machine, hv killed even a leopard, sloth bear and hyena.
RTR, Rajasthan
Vc~Lakhan Rana@my_rajasthan @ParveenKaswan @joy_bishnoi @surenmehra @nehaa_sinha @ipskabra pic.twitter.com/m1VwACDJcB
वाघ झोपेतून उठल्यावर कुत्र्याचा आवाज कायमचा बंद होतो. वाघ त्याला आपली शिकार बनवतो. कुत्र्याची विल्हेवाट लावल्यानंतर वाघ त्याला तोंडात पकडून जंगलाच्या दिशेने चालत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ एका ट्विटर युजरने शेअर केला आहे, जो ही बातमी लिहिपर्यंत 140 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, झोपलेल्या वाघाला हलक्यात घेऊ नका.
या व्हायरल व्हिडीओवर यूजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि कमेंट्स टाकत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मला वाटते की व्हिडीओसाठी या कुत्र्याचा जबरदस्तीने बळी दिला गेला आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘मी कुत्र्याच्या धाडसाचे कौतुक करतो पण शौर्य आणि मूर्खपणा यात खूप फरक आहे. पण मृत्यू आला तर कोणीही वाचणार नाही.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘आ बैल मुझे मार.’