जाहिरात
मराठी बातम्या / Viral / घराच्या पोटमाळ्यावरुन एका वर्षापासून रोज रात्री यायचे विचित्र आवाज; सत्य समजताच हादरलं कपल

घराच्या पोटमाळ्यावरुन एका वर्षापासून रोज रात्री यायचे विचित्र आवाज; सत्य समजताच हादरलं कपल

घराच्या पोटमाळ्यावरुन एका वर्षापासून रोज रात्री यायचे विचित्र आवाज; सत्य समजताच हादरलं कपल

या पेस्ट कंट्रोलरनं (Pest Controller) सोशल मीडियावर मधमाशांच्या मोठ्या पोळ्याचा फोटो शेअर केला आहे. हे जवळपास ३ फूट लांब आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 ऑक्टोबर : अनेकदा माणसाला आपल्याच घरात असलेल्या काही गोष्टींबद्दल माहिती नसते. माणसं वर्षानुवर्षे एकाच घरात राहतात मात्र तरीही आपल्या घरात आपल्याशिवायही कोणीतरी राहात आहे, याची चाहूलही त्यांना लागत नाही. इंग्लंडमध्ये (England) राहणाऱ्या एका कपलसोबतही असंच झालं. या कपलच्या घरामध्ये जवळपास एका वर्षापासून एक लाख मधमाशा राहात होत्या (Lakhs of Honey Bees in House). एका वर्षानंतर त्यांना ही बाब समजली. या घटनेबद्दल आरसी पेस्ट मॅनेजमेंटच्या राल्फ क्लेव्सनं सोशल मीडियावर (Social Media) सांगितलं. वडिलांचा फोन पाहताच मुलानं पोलिसांना कॉल करून घरी बोलावलं; कारण वाचून व्हाल थक्क या पेस्ट कंट्रोलरनं (Pest Controller) सोशल मीडियावर मधमाशांच्या मोठ्या पोळ्याचा फोटो शेअर केला आहे. हे जवळपास ३ फूट लांब आहे. हा फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. राल्फनं हा पोळा रग्बीमध्ये राहणाऱ्या एका कपलच्या घरातील पोटमाळ्यावरुन उतरवला. त्यांनी सांगितलं की तिथे असे अजून दोन पोळे होते. त्यांची साईज छोटी होती, तरीही ते फुटबॉलच्या साईजचे होते. मात्र, हा पोळा सर्वात मोठा होता. स्वतः सहा फूट एक इंच उंची असलेल्या राल्फनं सांगितलं की हा पोळा जवळपास त्यांच्यापेक्षा अर्धा होता. अरे बापरे! झोका देता देता स्वतःही हवेत उडाला तरुण; पाहा VIDEO पोळा पाहून राल्फनं सांगितलं, की यात जवळपास एक लाख मधमाशा राहात होत्या. राल्फच्या करिअरमध्ये मिळालेला हा सर्वात मोठा पोळा होता. राल्फने सांगितलं, की त्यांनी १९९७ मध्ये पेस्ट कंट्रोलरचं काम सुरू केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत पाहिलेल्या सर्व पोळ्यांमध्ये हा सर्वात मोठा होता. मात्र, राल्फसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा पोळा त्यावेळी रिकामा होता. त्यांनी सांगितलं की मधमाशा हा पोळा सोडून गेल्या आहेत. त्या एका वर्षापर्यंतच एका पोळ्यात राहतात. यानंतर त्या आपलं घर बदलतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात