मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बाप रे! खांद्यावर पोपट आणि हातात अजस्र अजगर घेऊन फिरतो हा माणूस, पाहा VIDEO

बाप रे! खांद्यावर पोपट आणि हातात अजस्र अजगर घेऊन फिरतो हा माणूस, पाहा VIDEO

Python and Parrot Video: अनेक माणसं प्राणीप्रेमी असतात. या माणसानं मात्र प्राण्याच्या प्रेमात भन्नाटच गोष्ट केली आहे.

Python and Parrot Video: अनेक माणसं प्राणीप्रेमी असतात. या माणसानं मात्र प्राण्याच्या प्रेमात भन्नाटच गोष्ट केली आहे.

Python and Parrot Video: अनेक माणसं प्राणीप्रेमी असतात. या माणसानं मात्र प्राण्याच्या प्रेमात भन्नाटच गोष्ट केली आहे.

    मुंबई, 2 मार्च : सोशल मीडियावर रोज नवनव्या गोष्टी व्हायरल होत असतात. लोकांना या गोष्टी कधी अस्वस्थ करतात. कधी आनंद देतात तर कधी डोळ्यात पाणी आणतात. (social media viral video) सध्या सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत दिसतो आहे एक अजगर आणि एक व्यक्ती. एक व्यक्ती रस्त्यावरून चालताना यात दिसतो आहे. (python video viral on social media) या व्यक्तीच्या हातात चक्क एक अजगर आहे. सोबतच त्याच्या खांद्यावर एक पोपटही बसलेला दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत. टिकटॉकवर वावरणारी हॅले रॉबेन सिग्नलवर आपल्या दोस्तांसोबत थांबली होती. (python video with a person shared on tiktok) तिनं पाहिलं, की एका मुलाच्या हातात अजगर आहे आणि तो रस्त्यावर मजेत चालतो आहे. रॉबेननं लगेच या सगळ्याचं चित्रीकरण केलं. आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केलं. यात एक व्यक्ती आपल्या खांद्यावर पिवळ्या रंगाचा पोपट घेऊन चालतो आहे. त्याच्या एका हातात अजगर आहे. रॉबेनच्या सोबत बसलेली तिची दोस्तही यावर हसते आहे. या व्यक्तीच्या हातात अजगर आहे यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. (python video gone viral on you tube) हेही वाचा पाकिस्तानात गिरवले जात आहेत मराठीचे धडे: पाहा VIDEO यात एक व्यक्ती असंही म्हणतो आहे, की तू माझी गम्मत करतो आहेस का? त्याला पहा, तो आपला वेळ किती चांगला घालवतोय. या व्हिडिओत काही सेकंदांनंतर रस्ता क्रॉस करण्याचं बटन दाबण्यासाठी व्यक्तीनं अजगराला जमिनीवर ठेवलं. आणि नंतर अजगराला दुसऱ्या हातात पकडत तो मोबाईलवर काहीतरी वाचत होता. आणि रस्ता क्रॉस करण्याची वाट पाहत होता. हेही वाचा 'डुकराच्या बड्डे'ला मधमाशांनी आणला केक, पुण्याच्या क्युट चिमुरडीचा भन्नाट VIDEO व्हिडिओ पहिल्यांदा टिक-टॉकवर शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगात व्हायरल झाला. आता इथं इतर प्लॅटफॉर्म्सवरही पोस्ट केला गेला. हा व्हिडिओ टिकटॉकवर ४० हजारांहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. काही लोकांनी या व्यक्तीनं अजगराबाबत गोल्ड कोस्ट स्नेक कॅचर्सनं एका सापाच्या हँडलरला म्हणलं, 'कॅप्टिव्ह सापांना सांभाळणं खूप अवघड असणं. तो साप तणावात असतो. त्याला इतर प्राण्यांसारखाच आदर मिळाला पाहिजे.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Social media, Social media viral, Tik tok, Viral video., Youtube

    पुढील बातम्या