मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'डुकराच्या बड्डे'ला मधमाशांनी आणला केक, पुण्याच्या या क्युट चिमुरडीचा भन्नाट VIDEO पाहाच

'डुकराच्या बड्डे'ला मधमाशांनी आणला केक, पुण्याच्या या क्युट चिमुरडीचा भन्नाट VIDEO पाहाच

सोशल मीडियावर हुशार आणि क्युट चिमुरडी कायम कौतुकाचा विषय बनतात. हा वाढदिवस पुण्यात पुलाखाली साजरा करणार असं सांगणाऱ्या अशाच एका मस्त मुलीची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल. पाहा VIDEO

सोशल मीडियावर हुशार आणि क्युट चिमुरडी कायम कौतुकाचा विषय बनतात. हा वाढदिवस पुण्यात पुलाखाली साजरा करणार असं सांगणाऱ्या अशाच एका मस्त मुलीची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल. पाहा VIDEO

सोशल मीडियावर हुशार आणि क्युट चिमुरडी कायम कौतुकाचा विषय बनतात. हा वाढदिवस पुण्यात पुलाखाली साजरा करणार असं सांगणाऱ्या अशाच एका मस्त मुलीची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल. पाहा VIDEO

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 1 मार्च : सोशल मीडियावर रोज नवनवे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. पशू-पक्षी, सेलिब्रिटीज, पोलीस, डॉक्टर्स अशा अनेकांचे हे खास व्हिडिओज असतात. त्यात देशविदेशातील लहान मुलांचे व्हिडिओजही चटकन लक्ष वेधून घेतात. (viral videos of kids on social media)

लहान मुलांचे व्हिडिओज लक्षवेधी ठरतात ते त्यांच्या क्युटनेस आणि निरागसपणामुळं. सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरली आहे एक बोलकी आणि क्युट चिमुरडी. (small girl storytelling video on Facebook)

किरण क्षीरसागर यांनी आपल्या मुलीचा हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. चार मिनिटांचा हा व्हिडिओ असून त्यात ही मुलगी आपल्या वडिलांशी खूपच गंमतीदार संवाद करते आहे. किरण यांनी व्हिडिओला नाव दिलं आहे 'डुकराचा बड्डे'. (Kiran Kshirsagar viral video)

ही वसू नावाची इवलीशी पोरगी खरोखरच उत्स्फूर्त कथा रचत आपल्या वडिलांना गोड आवाजात डुकराच्या बर्थडेची धमाल कथा सांगते. ती म्हणते, की आज डुकराचा बड्डे होता आणि त्यानं मला बोलावण्यासाठी फोन केला होता.'(small girl tells story of pig video, pig birthday small girl video)

वडील आश्चर्यचकित होत विचारतात, की तुला त्यानं खरोखर फोन केला होता? त्यावर ती चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव आणत होकार देते आणि पुढची गोष्ट सांगते, की मलाच नाही तर वाघ, सिंह, डोरेमॉन, हत्ती अगदी मुंग्यांनाही या डुकरानं बोलावलं होतं. फुलपाखरं, चिमण्या माशा यासुद्धा वाढदिवसात आल्या आहेत.' (pig birthday small girl viral video)

हे ही वाचा अजब! तीन वर्षं गर्भवती राहिल्यानंतर महिलेनं दिला बकरीला जन्म, काय आहे प्रकरण?

हा वाढदिवस पुण्यात पुलाखाली साजरा करणार असं सांगत ती पुढं वडिलांच्या 'केक कोण आणणार?' या प्रश्नाला उत्तर देते 'हरीण आणि मधमाशा. केकवर हॅप्पी बर्थडे डुक्कर असं लिहिलेलं आहे.' सगळे प्राणी आणि मी जाणार आणि बाकी कुणीच नाही यायचं, अगदी वडिलांनीही नाही असं तिचं म्हणणं आहे.' वाढदिवस झाल्यावर सशाच्या गाडीत विरारला जायचा बेत आहे. तिथं डुकराचा मित्र पांडा राहत असून तिकडं पार्टी असणार आहे असंही या हुशार वसूचं म्हणणं आहे.

हे ही वाचा गंभीर आजाराचा सामना करतीये 'ही' चिमुकली, लिंबू पाणी विकून उपचारासाठी जमवते पैसे

मनातली कथा या इवल्याशा पोरीनं अशी रंगवून सांगितली आहे, की ऐकणारे तोंडात बोट घालतात. आतापर्यंत 78 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पहिला आहे. 2 दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 2 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्यात. सोबतच 1 हजार लोकांनी हा अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे.

First published:

Tags: Facebook, Pune, Small girl, Viral video.