मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अजबच! रहदारीच्या रस्त्यावर मधोमध लावलं गेलंय केळीचं झाड; काय आहे हे विचित्र प्रकरण? पाहा VIDEO

अजबच! रहदारीच्या रस्त्यावर मधोमध लावलं गेलंय केळीचं झाड; काय आहे हे विचित्र प्रकरण? पाहा VIDEO

तुम्हाला जर कोणी असं सांगितलं की शहरातील रहदारीच्या रस्त्यावर (Busy Road) मधोमध केळीचं झाडं लावलं (Banana Tree on Road) आहे, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 सप्टेंबर : तुम्हाला जर कोणी असं सांगितलं की शहरातील रहदारीच्या रस्त्यावर (Busy Road) मधोमध केळीचं झाडं लावलं (Banana Tree on Road) आहे, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र, अमेरिकेच्या (America) फ्लोरिडामध्ये असं घडलं आहे. UPI News च्या वृत्तानुसार, रस्त्यार जा-ये करणाऱ्या लोकांनाही या झाडामुळे काहीही अडचण येत नाही. काय आहे हे विचित्र प्रकरण (Weird News) जाणून घेऊया.

केळीचं हे झाड फ्लोरिडामधील एक रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात लावण्यात आलं आहे. रस्त्यावर असलेल्या या खड्ड्यात पाणी आणि चिखल होता. यामुळे या रस्त्यावरुन जाताना अनेक गाड्या यात अडकत असे. आता याठिकाणी झाड लावण्यात आल्यानं लोकांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. कारण, त्यांना याठिकाणी असलेल्या खड्ड्याचा अंदाज येतो.

महिलेनं कचरापेटीत फेकलं स्वतःचं बाळ; सोशल मीडियावर व्हायरल झाला Shocking Video

यूपीआय न्यूजच्या वृत्तानुसार, फ्लोरिडाच्या फोर्ट मायर्समध्ये होंड्रा ड्राईव्हजवळ रस्त्यावर एक दोन नाही तर कित्येक खड्डे आहेत. या गोष्टीकडे स्थानिक प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे. यामुळे विरोध करणाऱ्यासाठी लोकांनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात केळीचं झाड लावलं आहे. हे झाड लावण्याचा उद्देश अधिकाऱ्यांचं लक्ष या खड्ड्याकडे वेधणं आणि ये-जा करणाऱ्यांना सावध करणं हा आहे. मात्र, अद्याप हा खड्डा रिपेअर केला गेला नाही.

" isDesktop="true" id="602450" >

अचानकच एकमेकांवर तुटून पडले तीन प्राणी; शिकारीचा कधीही पाहिला नसेल असा PHOTO

या रस्त्यावरुन दररोज प्रवास करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे, की रस्त्यावर असलेल्या या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचंही नुकसान होतं. आता केळ्याचं झाड लावल्यामुळे हा अंदाज लावणं सोपं झालं आहे, की खड्डा कुठे आहे. WINK TV नावाच्या स्थानिक चॅनलनुसार, आता लोक आपली वाहने घेऊन कडेनं निघून जातात. स्थानिक अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की रस्ता प्रायव्हेट सेक्टरअंतर्गत येत असून याची दुरुस्तीही तेच करू शकतात.

First published:

Tags: Video Viral On Social Media, Viral news