• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अचानकच एकमेकांवर तुटून पडले तीन प्राणी; शिकारीचा कधीही पाहिला नसेल असा PHOTO

अचानकच एकमेकांवर तुटून पडले तीन प्राणी; शिकारीचा कधीही पाहिला नसेल असा PHOTO

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Viral Photo) एकसोबतच तीन प्राणी एकमेकांवर हल्ला करताना दिसले. फोटोमध्ये मगरीसोबतच पाणघोडा आणि जंगली म्हैस दिसत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 09 सप्टेंबर : जंगलातील जीवन हे अतिशय निराळं आहे. कारण इथे जिवंत राहण्यासाठी अगदी क्षणाक्षणाला मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं. ज्याला यातून स्वतःचा बचाव करणं शक्य होतं तो शेवटपर्यंत जिंकतो. जीव धोक्यात टाकूनच प्राणी जंगलात आयुष्य जगत असतात. नुकतंच रेबेका हर्बर्ट (Rebecca Herbert) नावाच्या एका महिलेनं आपल्या ट्विटरवर (Twitter) शिकारीचा असा फोटो (Wildlife Photo) शेअर केला जो पाहून सगळेच बुचकळ्यात पडले. विचित्र चोर! पोलिसांनी छापा मारला तेव्हा सापडला महिलांच्या अंतर्वस्त्रांचा ढीग व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Viral Photo) एकसोबतच तीन प्राणी एकमेकांवर हल्ला करताना दिसले. फोटोमध्ये मगरीसोबतच पाणघोडा आणि जंगली म्हैस दिसत आहे. हे तिघेही एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. तिघांचा हा फोटो पाहून नेटकरीही गोंधळले आहेत. कारण हे तिघंही नेमकं काय करतायेत असा प्रश्न त्यांना पडला आहे. या फोटोमध्ये म्हशीची मान मगरीनं धरल्याचं दिसून येतं. तर, म्हशीनं पाणघोड्यावर हल्ला केला आहे. दुसरीकडे पाणघोडा मगरीचा गळा आवळण्याच्या प्रयत्नात आहे. हे तिन्ही प्राणी एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. हा फोटो पाहून अनेकजण गोंधळले आहेत. नक्की इथे चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. Video- रस्त्यावर हलताना 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं शिकारीचा हा फोटो पाहून तुम्हीही गोंधळला असाल तर आम्ही तुमचा गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न करतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे, की आधी मगर म्हशीची शिकार करत असावी, मात्र, दोघांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अचानक पाणघोडा आला आणि ही शिकार अधिकच भयानक बनली. हा फोटो सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, ही घटना नेमकी कुठली आहे, हे समोर आलेलं नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: