नवी दिल्ली 30 जानेवारी : आज आम्ही तुम्हाला एका अशा शहराबद्दल सांगत आहोत, जिथे माणसं राहात नाहीत. इथे पोस्ट ऑफिसही नाही. इतकंच नाही तर पाणी, वीज अशा सुविधाही नाहीत. लोकांचा असा दावा आहे, की इथे असे लोक राहतात ज्यांना याची गरजच पडत नाही. त्यांना हवा, पाणी, वीज, दुकान, धान्य, गाडी या कशाचीच गरज पडत नाही. कारण ते फक्त आराम करतात आणि दुसऱ्यांची झोप उडवतात. आम्ही बोलत आहोत एका भूतांच्या शहराबद्दल (Ghost town) . टेक्सासचं बार्टलेट (Bartlett, Texas) शहर भूतांचं शहर म्हणून ओळखलं जातं. संशोधकांच्या मते, 100 वर्षांपूर्वी हे शहर ओसाड झालं होतं. आता त्याची काही जुनी छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यामध्ये या शहराची भीषणता स्पष्टपणे पाहायला मिळते. पण आश्चर्याची बाब म्हणजे एकेकाळी अत्यंत गजबजलेल्या या शहरात भुतांचा अधिवास कसा झाला. शेवटी तिथं असं काय घडलं होतं, ज्यामुळे लोकांच्या मनात भूत-प्रेतांची भीती निर्माण झाली होती. या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नाहीत. टेक्सासची राजधानी ऑस्टिनच्या उत्तरेस एक तासाच्या अंतरावर असलेलं बार्टलेट हे निर्जन शहर आहे. दलित नवरदेवाला घोड्यावर बसण्यास रोखलं; पोलीस सुरक्षा,हातात संविधान…निघाली वरात सुमारे 1600 लोक राहत असलेलं हे शहर आता निर्जन झालं आहे. गेल्या 100 वर्षांत इथलं चित्र अजिबातही बदललेलं नाही. 1929 ते 1933 या काळात हळूहळू इथले लोक इथून स्थलांतरित होऊ लागले. इथे उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं. जगण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत व्यवस्था नव्हती. इथं फक्त उपासमारीचं संकट होतं. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, या शहराला अचानक असं काहीतरी झालं की उपजीविकेसाठी सुरू केलेले प्रत्येक उद्योग बंद पडू लागले. आसपासही काही सुविधा नव्हत्या. अशा स्थितीत लोकांसमोर रोजगाराचं मोठं संकट उभं ठाकलं होतं. उपासमारीने लोकांचे जीव जावू लागल्याने इथून निघून जाण्याशिवाय लोकांकडे काहीही पर्याय उरला नव्हता. या शहराचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा असा दावा आहे, की त्याने जगातील वेगवेगळ्या भागांमधील 16 भूतांच्या शहराचे फोटो काढले आहेत. महिलेनं बाळाला दिलं अतिशय विचित्र नाव; ऐकताच पोट धरून हसू लागले लोक हे शहर एकेकाळी कापसाचं मोठं केंद्र होतं, पण या उद्योगातही मोठी घसरण झाली. रेल्वेचंही मोठं नुकसान झालं. हे चिंतेचं कारण बनलं. तेव्हा हे जाणवू लागलं, की आता या शहरातील प्रगतीची साधनं कामी येणार नाहीत. कदाचित कुठल्यातरी दैवी शापामुळे या शहराच्या प्रगतीला खीळ बसली असावी, असा अंदाज लावण्यात आला. त्यामुळे येथील रहिवाशांनी परिसर सोडून जाणंच योग्य मानलं. मात्र हे सर्व इतकं सोपं नव्हतं. स्थायिक झालेलं जग उध्वस्त करून नवीन शहरात स्थायिक होणं हा या लोकांसाठी एक कठीण प्रवास होता. ओसाड पडलेलं हे शहर आता सिनेमाचा सेट म्हणून वापरलं जातं. इथे अनेक टीव्ही शो आणि चित्रपट शूट केले गेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.