दलित वधू राहुल मेघवाल यांनी सांगितले की, जर घोड्यावरुन बसून वरात काढली तर कुटुंबाला 1 वर्षात गाव सोडण्याची धमकी गावकऱ्यांनी दिली. यानंतर वडिलांनी जिल्हाधिकारी यांना अर्ज दिला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत वरात काढण्यात आली. भीम आर्मीचे सदस्य सुनील यांनी सांगितलं की, वर मुलगा राहुल मेघवाल याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर येथे दाखल झालो. समाजात जातीवादाची मूळं इतकं खोलवर आहे की, कोणत्याही उच्च जातीचा व्यक्तीला कोणताही दलित मुलगा किंवा आदिवासी मुलगा घोडीवर बसून गावातून वरात काढू नये असं वाटतं. U19 World Cup : टीम इंडियात एक बदल, Not Out खेळाडूची झाली एन्ट्री मनसा पोलीस ठाण्याचे प्रभारी के.एल.डांगी यांनी सांगितले की, वरात काढताना आंदोलन होण्याची शक्यता दलित कुटुंबाकडून वर्तवली जात होती, त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने सर्व बंदोबस्त केला होता आणि वरात शांततेत काढण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनीही सहकार्य केले.Madhya Pradesh Police granted protection to a Dalit man for his wedding procession in the Sarsi village of Neemuch on January 27 "We've applied for police protection as there was fear that some people might disrupt the wedding procession," said Rahul Meghwal, the groom pic.twitter.com/Uv4oWlW2hJ
— ANI (@ANI) January 29, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh