नवी दिल्ली 09 जुलै : देशभरात गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून कोरोनानं (Coronavirus) थैमान घातलं आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लसीकरणाचा (Corona Vaccination) वेगही वाढवण्यात आला आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये लशींचा तुटवडा (Vaccine Shortage) जाणवत आहे. याच कारणामुळे लसीकरणाचा वेगही मंदावलेला आहे. काही राज्यांमध्ये तर परिस्थिती इतकी गंभीर आहे, की लशीच्या तुटवड्यामुळे नाराज लोक हिंसक झाले आहेत. ओडिसाच्या (Odisha) एक लसीकरण केंद्रावरही असंच चित्र पाहायला मिळालं. इथे लसीकरण केंद्रावर जमलेले लोक अचानक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ही घटना ओडिसाच्या गंजममधील एका लसीकरण केंद्राच्या बाहेर घडली. रांगेत उभा असलेल्या लोकांनी बॅरिकेड्स तोडल्याचं पाहायला मिळालं. 23 मिनिटं मृत्यू अनुभवलेल्या व्यक्तीनं सांगितलं नरकातील भयावह दृश्य, म्हणाला… एका व्यक्तीनं म्हटलं, की आम्ही सकाळपासून इथे उभा आहोत. इथे भरपूर गर्दी आहे. आंध्र प्रदेशातील लोकही याठिकाणी येत आहेत. सरकारनं लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करायला हवी. लसीकरण केंद्रावर झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की लोक सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करत नाहीत. यासोबतच बहुतेकांनी मास्कही लावलेलं नाही.
#WATCH | People in long queues lose calm, break barricacdes outside a vaccination centre in Ganjam, Odisha. "We've been here since morning. It's crowded, people from Andhra Pradesh also coming here; request govt to arrange more vaccination centres," said Sudhanshu (08.07) pic.twitter.com/2uj8kGUGFy
— ANI (@ANI) July 9, 2021
कोमोडो ड्रॅगनचा माकडावर हल्ला; शिकारीचा अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल ही गर्दी आणि लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न करावे लागत असल्याचं दिसत आहे. लसीकरणाचे मेडिकल अधिकारी आदित्य प्रसाद साहू म्हणाले, की लशींचा तुटवडा आहे. लोक लसीच्या तुटवड्यामुळे आक्रमक होत आहेत. लोकांनी बॅरिकेड्स तोडले आहेत आणि कोरोना नियमांचं पालनही केलं जात नाहीये. आंध्र प्रदेशहूनही लोक याठिकाणी येत आहेत. लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज आहे.