वॉशिंग्टनः अमेरिकेत (America) राहणाऱ्या एका व्यक्तीने मृत्यूनंतर नरक (Hell) पाहिल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीचं म्हणणं आहे, की त्यानं सुमारे 23 मिनिटं आपला जीव गमावला आणि यावेळी त्यानं जे अनुभवलं ते अतिशय भयानक होते. त्याला नरकात ओढून घेऊन जाण्यात आलं, जिथे त्यानं अनेक जळणारे मृतदेह पाहिले. एवढंच नव्हे तर दोन क्रूर राक्षसांसोबतही (Demons) त्याचा सामना झाला. जे त्याच्या शरीरापासून मांस वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते.
'द सन' च्या वृत्तानुसार बिल विसेनं (Bill Wiese) ख्रिश्चन ब्रॉडकास्टर टीसीटी नेटवर्कशी झालेल्या संभाषणात आपले अनुभव सांगितले. त्यानं सांगितलं, की एके रात्री जेव्हा तो पाणी पिण्यास उठला, तेव्हा त्याला असं वाटलं की जणू त्याचं शरीर त्याच्याबरोबर नाही. त्याला वाटलं की कोणीतरी त्याला खेचत आहे आणि थोड्यावेळाने तो एका अंधारातील कधीच न संपणाऱ्या गुहेत असल्याचं त्याला जाणवलं. बराच वेळ तिथून चालत गेल्यानंतर तो अशा ठिकाणी पोहोचला जिथे सर्वत्र मृतदेह जळत होते.
कोमोडो ड्रॅगनचा माकडावर हल्ला; शिकारीचा अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
बिल विसेनं सांगितलं, की त्याठिकाणी अतिशय गरम होत होतं. चारही बाजूला धूर आणि दुर्गंध होता. मृत्यूनंतरच्या जगासोबत त्यांचा सामना नोव्हेंबर 1998 मध्ये झाला होता. त्यांनी आपला हा भयानक अनुभव पुस्तकात (23 Questions About Hell) लिहिला. या पुस्तकाच्या एक मिलियनहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. बिलनं सांगितलं, की तिथे इतकी प्रचंड उष्णता होती, की मी आतापर्यंत जिवंत कसा आहे? मी इथे का आणि कसा आलो? हे मलाही समजत नव्हतं.
बिलनं पुढे म्हटलं, की इथेत दोन अत्यंत भीतीदायक राक्षसांसोबत माझा सामना झाला. एकानं मला उचलून भीतींवर आदळलं तर दुसरा माझ्या छातीवर बसला. तो आपल्या मोठमोठ्या पंजांनी माझी छाती फाडत होता. हे खरोखर घडत होतं. मलाच आश्चर्य वाटत होतं, की यानंतरही मी जिवंत आहे. बिलनं सांगितलं, की काहीच वेळात या अंधाऱ्या जागेत पांढरा प्रकाश झाला, कदाचित ते देव होते. यानंतर मी पुन्हा एकदा अंधार असलेल्या जागेत फेकलो गेलो.
कुत्र्याची डेअरिंग तर पाहा! थेट चित्त्याशीच पंगा; पुढे जे घडलं पाहून व्हाल हैराण
बिलनं सांगितलं, की याठिकाणी सतत लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तिथे एका खड्ड्यात हजारो लोकांना जाळलं जात होतं. दिसताना हे सर्व सापळे दिसत होते. बिलनं सांगितलं, की हे दृश्य नरकाप्रमाणं होतं. लोकांना त्यांच्या पापानुसार कदाचित वेगवेगळी शिक्षा दिली जात होती. त्यांनी सांगितलं, की सुमारे 23 मिनिटं मी या भीतीदायक आणि कधीही न विसरणाऱ्या अनुभवातून गेलो. जेव्हा डोळे उघडले आणि मी घरात सुरक्षित असल्याचं समजलं तेव्हा सुटकेचा श्वास घेतला, असंही बिल म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Viral news