मराठी बातम्या /बातम्या /Viral /कोमोडो ड्रॅगनचा माकडावर हल्ला; शिकारीचा अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

कोमोडो ड्रॅगनचा माकडावर हल्ला; शिकारीचा अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडिओ (Video on Social Media) शेअर केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात एक ड्रॅगन (Komodo Dragon) माकडावर हल्ला करताना दिसत आहे.

नवी दिल्ली 09 जुलै : शिकारी प्राणी नेहमीच शिकारीच्या शोधात असतात आणि संधी मिळताच त्यावर अक्षरशः तुटून पडतात. हे प्राणी शिकार करण्यासाठी डोकं आणि वेग या दोन्हीचा वापर करतात. विशेषतः सिंह आणि वाघ अशा प्राण्यांचा अंदाज तर पाहण्यासारखा असतो. सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडिओ (Video on Social Media) शेअर केले जातात. यात प्राणी एकमेकांची शिकार करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात एक कोमोडो ड्रॅगन (Komodo Dragon) माकडावर हल्ला करताना दिसत आहे.

असा होतो गेंड्याचा जन्म; Baby Rhinoचा व्हिडीओ CCTV कॅमेरात कैद

व्हायरल व्हिडिओमध्ये एक ड्रॅगन माकडाची शिकार (Komodo Dragon Ate a Monkey) करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये दिसतं, की ड्रॅगननं आपल्या तोंडात माकडाची मान पकडली आहे. हे माकड धडपड करून ड्रॅगनच्या तावडीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ड्रॅगनची ताकद आणि पकड यापुढे माकडही काहीच करू शकत नाही आणि अखेर ते जीव सोडतं. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

कुत्र्याची डेअरिंग तर पाहा! थेट चित्त्याशीच पंगा; पुढे जे घडलं पाहून व्हाल हैराण

हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hayat._vahsh नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की हे दृश्य खरंच हैराण करणारं होतं. लोक ही व्हिडिओ क्लिप एकमेकांना शेअर करण्यासोबतच यावर वेगवेगळ्या कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच थक्क झाला असाल.

First published:

Tags: Shocking video viral, Wild animal