जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! इथे ब्रेडच्या एका पॅकेटसाठी द्यावे लागतात पोतं भरून पैसे; मोजून नाही तर वजनावर घेतात नोटा

बापरे! इथे ब्रेडच्या एका पॅकेटसाठी द्यावे लागतात पोतं भरून पैसे; मोजून नाही तर वजनावर घेतात नोटा

बापरे! इथे ब्रेडच्या एका पॅकेटसाठी द्यावे लागतात पोतं भरून पैसे; मोजून नाही तर वजनावर घेतात नोटा

जागतिक मान्यता नसल्यामुळे हा देश आजपर्यंत आपल्या पायावर उभा राहू शकलेला नाही. येथे रोजगार, शिक्षण, आरोग्य सुविधा यांची वाईट स्थिती आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 23 जुलै : भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती (Petrol Price) 100 रुपये प्रति लीटरपेक्षा अधिक झाल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे. अशात तुम्हाला असं समजलं की जगात एक देश असा आहे, जिथे ब्रेड (Bread) विकत घेण्यासाठीही पिशवी भरून पैसे लागतात, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सहाजिकच तुम्ही हैराण व्हाल. मात्र, आज आम्ही अशाच एका देशाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. वाढत्या महागाईच्या समस्येसोबत झुंज देणाऱ्या या देशाचं नाव आहे सोमालीलँड (Somaliland). हा देश आफ्रिका खंडाच्या पूर्वेला आहे. जगातील इतर देशांनी याला मान्यता न दिल्यानं त्याला सोमालियाचाच (Somalia) एक भाग म्हणून ओळखलं जातं. मात्र तरीही इथल्या लोकांनी त्याला स्वयंघोषित देश बनवलं आहे. साध्या कागदाची अशी होते नोट! पाहा प्रिंटिंग प्रेसच्या आतला भन्नाट VIDEO 1991 मध्ये सोमालियामध्ये गृहयुद्ध सुरू झालं. ज्यानंतर हा देश सोमालीलँड म्हणून अस्तित्वात आला, परंतु जागतिक मान्यता नसल्यामुळे हा देश आजपर्यंत आपल्या पायावर उभा राहू शकलेला नाही. येथे रोजगार, शिक्षण, आरोग्य सुविधा यांची वाईट स्थिती आहे. हा स्वयंघोषित देश जगातील सर्वात गरीब देशांमध्ये गणला जातो. या देशाचं चलन ‘सोमाली शिलिंग’ची (Somali Shilling) अवस्थाही अत्यंत वाईट आहे. जगातील इतर देशांमध्ये या देशाच्या चलनाचे काही मूल्य नाही. मात्र, तिथे चलनवाढीचे दरही बऱ्यापैकी वाढले आहेत. परिस्थिती अशी आहे की ब्रेडचं एक पॅकेट विकत घेण्यासाठीही लोकांना एका पोत्यात पैसे घेऊन जावं लागतं. विशेष म्हणजे हे चलन केवळ 500 आणि 1000 च्या नोटांमधील आहे. त्या नोटा मोजण्याऐवजी दुकानदार त्यांचं वजन करतात आणि ब्रेडची पाकीटे देतात. रशियात आलं डासांचं वादळ; Video पाहून तुमचाही उडेल थरकाप सोमालीलँडमध्ये लोकांनी जागोजागी दुकाने लावली आहेत. जिथे ते ‘सोमाली शिलिंग’ डॉलर्समध्ये एक्सचेंज करतात. सध्या तिथे 1 डॉलरची किंमत 8500 शिलिंग इतकी आहे. सध्या सोमालीलँडमध्ये केवळ 100, 500, 1000 आणि 5000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिथे दहा डॉलरमध्ये 50 किलो शिलिंग खरेदी करता येतात. मात्र, इतके पैसे देऊनही तुम्ही तिथे फार सामान खरेदी करू शकणार नाही. आता इथल्या लोकांना ही चिंता आहे की त्यांचं हे चलन कधीही बंद होऊ शकतं. महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकार कधीही जुन्या नोटा बंद करून नवीन चलन बाजारात आणेल अशी भीती तिथल्या लोकांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात