Home /News /viral /

रशियात आलं डासांचं वादळ; Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

रशियात आलं डासांचं वादळ; Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

त्या टोळधाडींना पळवून लावण्यासाठी सरकार आणि शेतकऱ्यांनीही अनेक उपाय योजले होते.

    मुंबई 22 जुलै: गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तान, पाकिस्तानातून भारताच्या सीमावर्ती भागात टोळधाड आल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. त्यांचे व्हिडिओही (Video) टीव्हीवर पाहिले आहेत. टोळ हे कीटक उभ्या असलेल्या पिकांवर हल्ला चढवतात आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान करतात. त्यामुळे त्या टोळधाडींना पळवून लावण्यासाठी सरकार आणि शेतकऱ्यांनीही अनेक उपाय योजले होते. हे सांगायचं कारण असं की तसंच एक डासांचं वादळ नुकतंच रशियातल्या काही भागात पहायला मिळालं. एका कार ड्रायव्हरने (Car Driver) या वादळाचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर टाकला तो जगभर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची टोळी आकाशात उंच उडताना दिसत आहे. जणू एखादं वादळ यावं तसंच या डासांचं वादळ (Mosquito Cyclone)आलं आहे असं वाटतंय. रशियाच्या (Russia) पूर्व भागातील Kamchatka Krai इथं हा प्रकार 17 जुलैला घडला असून त्याचा 1 मिनिटं 2 सेकंदांचा व्हिडिओ कोब्रा पोस्टच्या युट्युब चॅनलवर (Cobra Post) पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डासांची ही टोळी एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जातान स्पष्ट दिसत आहे. बेपत्ता कुत्रा गॅरेजच्या भिंतीत कसा पोहोचला? अग्निशमन दलानं केली सुटका न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार एका कार ड्रायव्हरनी या डासांच्या टोळीचा व्हिडिओ तयार केला आहे. कार चालवतानाच त्याला समोर आकाशात ही टोळी दिसली. त्याला कार चालवताना समोरचा रस्ताच दिसेना. त्यामुळे तो चकितच झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात डास त्याने पहिल्यांदाच पाहिले होते. मग त्याने कार चालवतानाच हा व्हिडिओ शूट केला. रशियातल्या नागरी वस्तीवरून हे डासांचं वादळ जातंय हे व्हिडिओत व्यवस्थित दिसतंय. या व्हिडिओत दिसतंय की त्या ड्रायव्हरला हा व्हिडिओ तयार करण्यासाठी या डासांच्या टोळीचा पाठलाग करावा लागला आहे. त्याने तसं सांगितल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. हज यात्रेत घडला इतिहास; मक्केत पहिल्यांदाच महिला रक्षक तैनात डासांची आलेली टोळी पाहून या भागातील लोक भयभीत झाले होते. त्यांचं मत आहे की या टोळीमुळेच या बागात खूप आजार पसरले आहेत. तज्ज्ञांचं मत असं आहे की या डासांच्या वादळामध्ये किंवा टोळीमध्ये बहुतांश नर डास आहेत. त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता खूपच कमी आहे. टोळधाडींना आपण पाहिलंच आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे जगातलं पहिलंच डासांचं वादळ आहे का? पण तसं अजिबात नाही या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्जेंटिनामध्येही असंच वादळ आलं होतं. सध्या सोशल मीडियामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे डासांचं वादळ पटकन सगळ्या जगाला कळालं. अजूनही हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
    First published:

    Tags: Russia, Shocking video viral

    पुढील बातम्या