मराठी बातम्या /बातम्या /Viral /पावरी गर्लचा नवा VIDEO आला समोर; आता आपल्या आवाजामुळे आली चर्चेत

पावरी गर्लचा नवा VIDEO आला समोर; आता आपल्या आवाजामुळे आली चर्चेत

सध्या दनानीरचा जो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, यात ती आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ अगदीच वेगळा आहे

सध्या दनानीरचा जो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, यात ती आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ अगदीच वेगळा आहे

सध्या दनानीरचा जो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, यात ती आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ अगदीच वेगळा आहे

नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्या Pawari स्टाईलनं धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी तरुणी दनानीर (Dananeer Mobeen) तुम्हा सर्वांच्याच लक्षात असेल. ही तिच तरुणी आहे जिच्या Pawari स्टाईलची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. तिच्या व्हिडिओला अनुसरून नंतर काही गाणीही आली. आता पुन्हा एकदा इंटरनेटवर तिचा नवा व्हिडिओ व्हायरल (New Video of Pawari Girl) झाला आहे. हा व्हिडिओ तिच्या Pawari व्हिडिओपेक्षाही अधिक मजेशीर आहे.

प्रियकर सतत मागवायचा महिलांचे कपडे; सत्य समोर येताच गर्लफ्रेंडला बसला धक्का

सध्या दनानीरचा जो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, यात ती आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ अगदीच वेगळा आहे, कारण यात पावरी गर्ल दनानीर मुबीन गाणं (New Song Video of Dananeer) गात आहे. तेही इतकं सुरेख आवाजात की तिचा आवाज ऐकून कोणीही या आवाजाच्या प्रेमात पडेल. या व्हिडिओमध्ये तिनं ‘खोया जो तू होगा मेरा क्या’ हे गाणं गायलं आहे. हा व्हिडिओ दनानीरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

दनानीर मुबीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाचेही फॅन झाले आहेत. तिचे चाहते यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. याआधीही तिनं तेरा मेरा रिश्ता पुराना’ गाणं गात चाहत्यांची मनं जिंकली होती.

नखरे करणाऱ्या नवऱ्याला पत्नीनं शिकवला धडा; आधी कानशिलात लगावली अन् मग..., VIDEO

दनानीर पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिनं 6 फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर आपला व्हिडिओ शेअर केला होता. तिचा पार्टीला पावरी बोलण्याचा अंदाज लोकांना इतका आवडला की रातोरात या व्हिडिओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला. यानंतर प्रत्येक ठिकाणी तिची चर्चा होऊ लागली. अनेकांनी तिची ही पावरी स्टाईल कॉपी करत आपले व्हिडिओ बनवले आणि दनानीर इंटरनेटच्या दुनियेत स्टार बनली.

First published:
top videos

    Tags: Song, Video Viral On Social Media