मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रियकर सतत मागवायचा महिलांचे कपडे; सत्य समोर येताच गर्लफ्रेंडला बसला धक्का

प्रियकर सतत मागवायचा महिलांचे कपडे; सत्य समोर येताच गर्लफ्रेंडला बसला धक्का

तरुणीनं सांगितलं, की बॉयफ्रेंड सतत कपडे मागवत असे. हे तिला त्याच्या ईमेलमुळे समजलं होतं. अखेर तिनं ब्रॅण्डच्या स्टोरमध्ये जाऊन या गोष्टीचा तपास करण्याचा निर्णय घेतला.

तरुणीनं सांगितलं, की बॉयफ्रेंड सतत कपडे मागवत असे. हे तिला त्याच्या ईमेलमुळे समजलं होतं. अखेर तिनं ब्रॅण्डच्या स्टोरमध्ये जाऊन या गोष्टीचा तपास करण्याचा निर्णय घेतला.

तरुणीनं सांगितलं, की बॉयफ्रेंड सतत कपडे मागवत असे. हे तिला त्याच्या ईमेलमुळे समजलं होतं. अखेर तिनं ब्रॅण्डच्या स्टोरमध्ये जाऊन या गोष्टीचा तपास करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडनं (Girlfriend-Boyfriend) एकमेकांना धोका (Cheating in Relationship) दिल्याचे अनेक किस्से तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील. यातील अनेक पार्टनर तर स्पष्टपणे हे मान्य करतात, की अनेक काळापासून ते लपून दुसऱ्याच कोणाला डेट करत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) नुकतंच एका तरुणीनं एक किस्सा शेअर केला आहे, की कशा पद्धतीनं बॉयफ्रेंडनं तिला धोका दिला.

'झोपूही देत नाही, काय करू?', नवऱ्याच्या 'त्या' सवयीला वैतागलेल्या बायकोची व्यथा

द सनच्या वृत्तानुसार, या तरुणीनं सांगितलं, की तिचा बॉयफ्रेंड अनेकदा मुलींची कपडे (Ladies Dresses) मागवत असे. मात्र, तो कधीच तिला हे कपडे गिफ्ट (Gift) करत नसे. इतकंच नाही तर याबाबत काही विचारलं तरी तो ही गोष्ट टाळत असे. अनेक दिवस हे असंच चालत राहिलं. यानंतर एक दिवस तिनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मोबाईलवर अजब मेल (Weird Mail) पाहिला. हा कुठल्यातरी क्लोथिंग ब्रॅण्डचा होता. जिथून त्यानं कपडे मागवले होते. यानंतर तिला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. आपला बॉयफ्रेंड आपल्याला धोका देत असल्याचं तिला जाणवलं. मात्र, तरीही तिला हे समजतं नव्हतं की हे कपडे तो नेमके कोणाला देत आहे. कारण हे कपडे थेट पाठवले जात होते.

सावध राहा! सार्वजनिक शौचालयातच दबा धरून बसलाय जंगलाचा राजा; हा VIDEO कुठला पाहा

तरुणीनं सांगितलं, की बॉयफ्रेंड सतत कपडे मागवत असे. हे तिला त्याच्या ईमेलमुळे समजलं होतं. अखेर तिनं ब्रॅण्डच्या स्टोरमध्ये जाऊन या गोष्टीचा तपास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्टोअर मॅनेजरनं प्रायव्हसीचं कारण देत हे कपडे कोणत्या पत्त्यावर जात आहेत, हे सांगण्यास नकार दिला. मात्र, त्यांनी तिला त्या व्यक्तीचं फर्स्ट नावं सांगितलं. नाव जाणून तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण ते तिच्या बेस्ट फ्रेंडचं नाव होतं. तिला समजलंच नाही की कधी तिचा पार्टनर आणि बेस्ट फ्रेंड रिलेशनमध्ये आले.

महिलेनं शेअर केलेला हा व्हिडिओ 40 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकांनी कमेंट करून तरुणीला सहानुभूती दिली आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की नक्कीच ती तुझी बेस्ट फ्रेंड नाही, नाहीतर असंच कधीच झालं नसतं.

First published:
top videos

    Tags: Boyfriend, Relationship, Viral news