क्या बात है! ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्रिया

क्या बात है! ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्रिया

ऑरेशन थिएटरमध्ये बोलत असताना डॉक्टरांनी रुग्णाच्या मेंदूचं ऑपरेशन केलं आहे. ही घटना परदेशात नाही तर चक्क भारतात घडली आहे.

  • Share this:

अजमेर, 19 सप्टेंबर : नुसतं ऑपरेशनचं नाव आलं तरी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांच्या पोटात गोळा येतो. याआधी व्हायोलिन वाजवत असणाऱ्या तरुणीचं ऑपरेशन झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता चक्क रुग्ण ऑरेशन थिएटरमध्ये बोलत असताना डॉक्टरांनी रुग्णाच्या मेंदूचं ऑपरेशन केलं आहे. ही घटना परदेशात नाही तर चक्क भारतात घडली आहे.

राजस्थानच्या अजमेरमध्ये ही घटना समोर आली आहे. जैतारणमधील पाली इथे राहणाऱ्या 30 वर्षांच्या सावर राम नावाच्या रुग्णाला ब्रेम ट्यूमर झाला होता. या रुग्णाचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. ऑपरेशन म्हटलं तरी जीव अर्धा होतो. अशा वेळी या रुग्णानं घाबरून न जाता त्याने थेट डॉक्टरांसोबत गप्पा मारायला सुरुवात केली.

हे वाचा-नौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO

बऱ्याचदा ऑपरेशन थिएटरमध्ये अशा पद्धतीचं ऑपरेशन जोखमीचं असल्यानं खूप लक्षपूर्वक करावं लागतं आणि त्यात डॉक्टरनं रुग्णासोबत बोलत बोलत अत्यंत कुशलपणे हे ऑपरेशन केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ब्रेन आणि स्पाइन सर्जन डॉक्टर सिद्धार्थ वर्मा यांनी आपलं कसब लावून ही गाठ रुग्णासोबत गप्पा मारताना मेंदूमधून काढली. हे ऑपरेशन सरकारच्या आयुष्मान भारत महात्मा गांधी राजस्थान आरोग्य विमा योजनेंतर्गत विनामूल्य करण्यात आलं.

हे वाचा-OMG! खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

न्यूरो सर्जन डॉक्टर सिद्धार्थ वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्यूमर जिथून मेंदू आवजावर नियंत्रण करतो त्या भागाच्या अगदी जवळ होता आणि तिथेच शस्रक्रिया करायची होती. अशावेळी रुग्णाचा ट्यूमर काढत असताना स्वरयंत्रातून आवाज जाण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाच्या संपूर्ण शरीरासाठी भूल न देता हे ऑपरेशन करणं गरजेचं असतं. यामध्ये मोठी जोखीमही असते आणि संभाव्य धोक्याचाही विचार करावा लागतो.

जोखीम पत्करून डॉक्टरांनी या रुग्णाला जिथे ऑपरेशन करायचं त्या भागात भूल दिली आणि पूर्णवेळ डोळे उघडे ठेवून बोलत राहिले. ज्यामुळे डॉक्टरांना ऑपरेशन नंतर या रुग्णाचा आवाज जाण्याचा धोका टाळता आला. डॉक्टरांच्या टीमचं कसब आणि कौशल्य यामुळे हे ऑपरेशन होऊ शकलं. याआधी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायोलीन वाजवत असताना तरुणीचं यशस्वी ऑपरेशन झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 19, 2020, 2:34 PM IST
Tags: rajasthan

ताज्या बातम्या