OMG! खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

OMG! खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

ट्रक खड्ड्यातून बाहेर यायचा राहिला बाजूलाच पण त्याचं AXLE बाहेर आल्यानं आणखीन एक समस्या निर्माण झाली.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : रस्त्यावर अवजड वाहानं अडकतात तेव्हा त्यांना खड्ड्यातून काढणं खूप कठीण होतं. छोट्या वाहनांना काढणं शक्य असतं पण मोठ्या गाड्यांसाठी टोइंग व्हॅनचीच आवश्यकता असते. बस, क्रेन किंवा ट्रक खड्ड्यात अडकल्यानंतर त्याला काढणं म्हणजे अगदी मोठी डोकेदुखी होते. अशावेळी टोईंग व्हॅनची मदत घ्यावी लागते. अशाच ट्रकला टो करताना नेमकं काय घडलं याचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कच्चा रस्त्यात अडकलेल्या ट्रकला काढण्यासाठी टोईंग व्हॅनऐवजी जेसीबीची मदत घेतली आणि मोठा अनर्थ घडला. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की जेसीबीने हा ट्रक खेचून खड्ड्यातून बाहेर काढण्याचा तरुणानं प्रयत्न केला. हा ट्रक बाहेर येण्याऐवजी AXLE बाहेर आला आहे सगळी मेहनत वाया गेली. ट्रक मात्र जागचा हल्लाच नाही. ट्रक चालकाला मात्र आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना आली असावी. कारण या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ते या ट्रकचं.

हे वाचा-मास्क नाही घातले म्हणून दिले नाही पेट्रोल, गुंडांचा पंपावर राडा, पाहा हा VIDEO

@fred035schultz नावाच्या युझरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आतापर्यंत 21 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 113 जणांनी रिट्वीट केला आहे. जेसीबीने चुकीच्या पद्धतीनं टो केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं काही युझर्सनी म्हटलं आहे.

या ट्रकच्या मागे ट्रॅक्टर अडकल्याचंही चर्चा आहे. त्यामुळे जेसीबीला हा ट्रक खड्ड्यातून काढण्यासाठी जास्त जोर लावावा लागला. त्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या व्हिडीओवर तुफान कमेंट्स येत असल्याचंही पाहायला मिळत आहे. गाडी टो करताना अनेक गमतीशीर घटना होत असतात पण हा व्हिडीओ मात्र जबरदस्त व्हायरल झाला. ट्रक खड्ड्यातून बाहेर यायचा राहिला बाजूलाच पण त्याचं AXLE बाहेर आल्यानं आणखीन एक समस्या निर्माण झाली.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 19, 2020, 1:52 PM IST

ताज्या बातम्या