जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO

नौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO

नौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO

भारतीय नौदलाच्या अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये विराटनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर : भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस विराट (ins viraat) आज तिच्या अखेरच्या जलप्रवासाला मार्गस्थ झाली आहे. 6 मार्च 2017 साली नौदलाच्या सेवेतून ही युद्धनौका निवृत्त झालेली होती. राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे युद्धनौका आता भंगारात जाणार आहे. आयएनएस विराट 2017 साली निवृत्त झाल्यानंतर  त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धसंग्रहालयात रूपांतर करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काही होऊ शकली नाही. त्यामुळे नौदलाने तीन वर्ष वाट पाहून गेल्या वर्षी आयएनएस विराट भंगारात काढण्याची निविदा प्रक्रीया सुरू केली.

जाहिरात

त्यानंतर आता तिच्यावरील सर्व सुरक्षात्मक संवेदनशिल ठरू शकणाऱ्या यंत्रणा नौदालाने काढून घेण्यात आल्या आहे. आयएनएस विराट ही आता एका खासगी स्क्रॅप कंपनीला भंगारात काढण्यासाठी सोपवण्यात आली आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास आयएनएस विराट आपला अखेरचा जलप्रवासला निघाली आहे. गुजरातमधील अलंग येथील जहाज तोडणी शिपयार्डच्या दिशेनं तिने प्रवास सुरू केला आहे. यावेळी तीला टग बोटने टो करून घेऊन जाण्यात येणार आहे. 29 वर्षाच्या भारतीय नौदलाच्या सेवेतून निवृत्त होऊन आयएनएस विराटही आयएनएस विक्रांत प्रमाणे अखेर भंगारात जात आहे. मास्क नाही घातले म्हणून दिले नाही पेट्रोल, गुंडांचा पंपावर राडा, पाहा हा VIDEO आयएनएस विराट ही आधी ती ब्रिटनच्या नौदलाचा भाग होती. त्यानंतर 1987 साली ती भारतीय नौदलात सहभागी झाली. 28 हजार सातशे टन इतकं तिचं वजन आहे. तर तिची लांबी 226 मीटर एवढी आहे. भारतीय नौदलाच्या अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये विराटनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. जगातील सर्वाधिक काळ कार्यरत असलेली विमानवाहू युद्धनौका म्हणून आयएनएस विराटचा लौकिक आहे. भारतीय नौदलात विराटला ‘ग्रांड ओल्ड लेडी’ असेही म्हटले जात होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात